Friday, January 13, 2017
भुमि फाऊंडेशनचे सामाजिक कार्य प्रेरणादायी
Posted by vidarbha on 5:07:00 PM in अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /- | Comments : 0
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
विदर्भात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली संस्था"भूमि फाऊंडेशन "कार्य पाहून भारावून गेले आहे.संस्थाध्यक्ष तुषार अढाऊ,सचिव चंचल पितांबरवाले व त्यांची संपूर्ण टिम अतिशय उत्साही असून त्यांच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांनी मला आकर्षित केले आहे.एक महिला म्हणून पञकारिता क्षेञात कार्य करतांना मला आव्हानांचा सामना नित्य करावा लागतो.त्यामुळे भूमि फाऊंडेशनने विविध क्षेञात कर्तृत्व गाजवणारया महिलांचा सत्कार करुन त्यांना त्यांच्या आव्हानांना पेलण्याचे बळ दिले आहे,अश्या शब्दात अमरावती जिल्ह्यातील जनकल्याण बहुउद्देशिय संस्थेच्या संस्थापिका व साप्ताहिक विश्वरुपमच्या संपादिका रुपाली बुले ह्यांनी कौतुकोद्गार व्यक्त केले.रविवार,ता.८ जानेवारीला,राञी,अकोटला अंजनगाव मार्गावरील शिवाजी विद्यालयात भूमि फाऊंडेशनच्या " साविञी सन्मान सप्ताहाच्या " समारोपिय कार्यक्रमात रुपाली बुले ह्यांचा ठाणेदार सी.टी.इंगळे ह्यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.त्या वेळी आपल्या सत्काराला उत्तर देतांना त्या बोलत होत्या.त्याप्रसंगी भूमिपिठावर दारुबंदी विरोधात लढा देणारया बुलडाणा जिल्ह्यातील सेवाव्रती प्रेमलता सोनोने, सर्वश्री मोहन आसरकर,भाजपचे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ.राजेश नागमते,विजय जवंजाळ,प्रा.विद्याधर कोठीकर,तालुका पञकार संघाचे अध्यक्ष हरिओम व्यास,भूमिचे अध्यक्ष तुषार अढाऊ,सचिव चंचल पितांबरवाले,भूमिची समस्त टीम,पञकार बांधव आदि मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी रुपाली बुलेंच्या हस्ते अनेक कर्तृत्ववान महिला,भूमि सप्ताहातील विजेत्या स्पर्धक ह्यांचा सत्कार करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment