अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /--
काँमनवेल्थ गोल्ड विजेती हरीयानाची महिला कुस्तीपटू गीता फोगाट यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट दंगल टँक्स फ्री होण्या अगोदर अचलपूर येथील श्री टाँकीज येथे शालेय विद्यार्थ्याकरीता सवलतीमधे दाखवला जाणार आहे.
दंगल हा चित्रपट महिला सक्षमीकरण व भारतातील प्रसिध्द खेळ कुस्ती ला प्रोत्साहन देण्यारा आहे तसेच भारताची महिला कुस्तीपटू गीता फोगाट यांच्या काँमनवेल्थ गोल्ड मेडालीस्ट होण्याची संघर्ष कथा आहे.हा चित्रपट टँक्स फ्री व्हावा जेणे करून मुलींच्या बाबतीत असलेला गैरसमज दूर होईल तसेच महिला सक्षमीकरण होऊन देशाच्या कुस्ती या मैदानी खेळाला प्रोत्साहन मिळेल असे अनेक संघटना व पक्षांचे म्हणने आहे पंरतू शासन हा निर्णय घेईल त्याअगोदरच अचलपूर शहरातील नव्याने सुरू झालेल्या श्री टाँकीजच्या व्यवस्थापकांनी आपल्या शहरातील व आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गास ही सुवर्णसंधी शुक्रवार पासून उपलब्ध करून दिली आहे केवळ तीस रुपये दरावर दररोज सकाळी ९ ते १२ चा विशेष शो विद्यार्थाकरीता त्यांनी करायला सुरुवात केली आहे तरी जास्तीतजास्त संख्येने शाळा महाविद्यालयांच्या प्रमुखांनी व विद्यार्थ्यांनी या संधिचा लाभ घ्यावा असे व्यवस्थापक श्री टाँकीज अचलपूर यांनी आवाहन केले आहे.
Friday, January 13, 2017
अचलपूर येथील श्री टाँकीजमध्ये विद्यार्थ्यांना सवलतीमधे दाखवला जाणार दंगल चित्रपट
Posted by vidarbha on 5:08:00 PM in अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment