राहुल निर्मळ / बुलढाणा :-
खामगाव येथील बाळापूर फैल भागातील २२ वर्षीय बेपत्ता युवकाचा अकोला मार्गावर एका पडित विहिरीत मृतदेह आढळला या घटनेमुळे परिसरातील एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी मृतक युवकाच्या वडिलाने शिवाजी नगर पोलीस स्टेशनला खात्री बंडू विरुद्द मुलाचा खून केल्याची तक्रार दिली आहे या वरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे कुंदन देविदास शिंदे , हा ७ जानेवारी पासून बेपत्ता होता त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळालानाही तब्बल तीन दिवसानंतर कुंदन याचा मृतदेह अकोला महामार्गावरील महाबीज मंडळाच्या पाठीमागील विहिरीत तरंगताना नागरिकांना दिसून आला पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीबाहेर काढला असता त्याचे शरीरावर दोरीने दगड बांधून पाण्यात टाकल्याचे निदर्शनांत आले या प्रकरणी वडील देविदास शिंदे यांनी खत्री सर्विस सेंटरचे मालक अस्विन कुमार खत्री वय २३ व अमित संतोष खत्री वय १८ यांनी व त्यांच्या साथीदारांनी खत्री यांच्या कुटूंबातील मुलीसोबत संबंध असल्याच्या कारणावरून खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयन्त केल्याची तक्रार शिवाजी नगर पोलीस सटेशनला दिली आहे या वरून पोलिसांनी खत्री बंधू सह इतरांविरुद्द कलम ३०२ , २०१ , ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे
Friday, January 13, 2017
बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
Posted by vidarbha on 5:25:00 PM in राहुल निर्मळ / बुलढाणा :- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment