मुंबई –
पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात येणार्या आक्रमणांमुळे भारतीय जवान, नागरिक आणि पोलीस मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे देशभरात पाकच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली आहे. अशा वेळी १४ जानेवारीला वरळी येथे होत असलेल्या ‘जिओ फिल्मफेअर पुरस्कार २०१७’ मध्ये पाक कलाकार अभिनेता फवाद खान, गायक राहत फतेअली खान, आतिफ अस्लम आणि क्वारत उल अनी बलोच या चौघांना नामांकन देण्यात आले आहे. असे करणे म्हणजे भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा अवमान आहे, अशी संतप्त भावना हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. पाकिस्तानी कलाकारांना फिल्मफेअर पुरास्काराकरिता करण्यात आलेल्या नामांकनाच्या निषेधार्थ १३ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने दादर पश्चिम येथील कबुतरखाना येथे संतप्त निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात स्वराज्य मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ मुंबईकर, बजरंगदलाचे श्री. सूर्यभाग सिंग, गोवंश रक्षा समितीचे सर्वश्री जयेश धोंडे, दीप्तेश पाटील, भालचंद्र नागटिळक, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री प्रमोद पाटील, सुरेश महाडिक, स्वामी समर्थ संप्रदायाचे संतोष पातारे, मराठी तमिळ संघमचे श्री. सर्वानंद तेवर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे, समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे यांसह श्री बजरंग सेवादल, हिंदु राष्ट्र सेना, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी संघटनांचे कार्यकर्ते यांसह १०९ राष्ट्र आणि धर्म प्रेमी सहभागी झाले होते. या वेळी हस्तफलक धरून पाकिस्तान, तसेच फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन करणार्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
फेसबूकच्या माध्यमातून ५० सहस्रांहून अधिक जणांपर्यंत विषय पोचवण्यात आला, तसेच १० सहस्रांहून अधिक जणांनी फेसबूकच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला.
Post a Comment