जळगाव –
मलकापूर दंगलीतील निरपराध हिंदूंना त्वरित न्याय द्या; अन्यथा शिवसेना पद्धतीने आंदोलन करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे श्री. गजानन मालपुरे यांनी केले. ते २८ जानेवारीला जळगाव येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. श्री. मालपुरे पुढे म्हणाले की, मलकापूर दंगलीत सरकार तेथील धर्मांधांना पाठीशी घालत आहे आणि हिंदूंवर अन्याय करत आहे.
या वेळी श्री. आशिष गांगवे म्हणाले की, आपल्या निधर्मी देशात एखाद्या विशिष्ट समुदायास लाभ व्हावा, यादृष्टीने सवलत देणे हे घटनाविरोधी आहे. उत्तराखंड शासनाने मुसलमानांना नमाजासाठी ९० मिनिटांची सुटी जाहीर केली आहे. या घटनेच्या विरोधात हे आंदोलन असून याची नोंद घेऊन ही सवलत रहित करावी. महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालयातील देवतांच्या चित्रांविषयीचा धर्मद्रोही निर्णय जाहीर करून मागे घेतला. यातून या सरकारची एकंदरीत हिंदूंविषयी असणारी मानसिकता लक्षात येते. हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर म्हणाले की, भारत सरकारचे एन्सीआरटीच्या १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पाठयपुस्तकात गुजरात राज्यात झालेल्या दंगली या मुसलमानविरोधी होत्या अशी केवळ हिंदूविरोधी भूमिका या अभ्यासक्रमातून मांडली आहे. यातून तो अभ्यासक्रम शिकणार्याू विद्यार्थ्यांच्या मनावर चुकीचा इतिहास बिंबवला जात आहे. यापूर्वीही या संस्थेने क्रांतीकारकांना दहशतवादी ठरवले होते, तसेच मुसलमान राज्यकर्त्यांचा उदोउदा करणारे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करणारे आणि विद्यार्थ्यांची मने कलुषित करणारे सर्वच पाठ्यक्रम त्वरित पालटण्यात यावे, अशी मागणी या वेळी त्यांनी केली. या आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांशना देण्यात येणार आहे.
या वेळी जय भवानी ग्रुप, स्वराज्य निर्माण सेना, हिंदु एकता ग्रुप, जय मातादी ग्रुप, महाकाली मित्र मंडळ, शिवसेना, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था या संघटनांसह ९० हून अधिक हिंदुत्ववादी सहभागी झाले होते. आंदोलनाची सांगता श्लोक म्हणून करण्यात आली.
Post a Comment