सात दिवस भागवत , भजन –
कीर्तन व विविध कार्यक्रमाचे आयोजन
दिंडी परंपरा कायम
शहेजाद खान / चांदूर
रेल्वे /--
राज्यातील व खासकरून विदर्भातील
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्रेष्ठ बेंडोजी महाराज यात्रा महोत्सव
उद्या शनिवार पासून सुरु होणार आहे . विदर्भातील एकमेव संजीवन समाधी असलेले
देवस्थान तब्बल ६६३ वर्षाची परंपरा लाभलेल्या यात्रा महोत्सवाला संपूर्ण राज्यातील
भाविकांची रीघ लागणार आहे.
अनेक वर्षांपासून येथे
दरवर्षी संत श्रेष्ठ बेंडोजी महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात
येतो उद्या शनिवारी सकाळी कलश स्थापना
अभिषेक श्री वसंतराव घुईखेडकर यांचा हस्ते होणार असून दररोज सात दिवस हभप
गोदावरीबाई बंड यांचा सुमधुर वाणीतून भागवत
कथा होणार आहे. तर दररोज सकाळी काकड आरती
, रामधून , सामुदायिक प्राथना , सोबतच सायंकाळी हरिकीर्तन होणार आहे. V24News
त्यामध्ये ह.भ.प नामदेव महाराज , ह.भ.प मोहोड महाराज , ह.भ.प दिलीप
महाराज काकडे , ह.भ.प पडोळे महाराज , ह.भ.प विजय महाराज गव्हाणे , ह.भ.प योगेश
महाराज यावले यांचे हरिकीर्तन होणार असून ह.भ.पउमेश महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच घुईखेड , जावरा , पळसखेड
, निमगव्हाण , पिंपळखुटा येथिल महिला भजनी मंडळाचा वतीने दुपारी भजन आयोजित
करण्यात आले आहे. ४ फेब्रुवारीला गोपाल काला, दिंडी महोत्सव , दहीहंडी व
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थांचे सदस्य श्री प्रवीण घुईखेडकर
यांनी दिली आहे. मागील २ वर्षांपासून तळेगाव येथील शंकर पटावर बंदी आणल्या मुले
याठिकाणी भरणारा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला त्यामुळे यावर्षी दरवर्षी पेक्षा
मोठ्या प्रमाणात घुईखेड येथे यात्रा भरली जाईल अशी चर्चा जनमानसात आहे.
घुईखेड ते पैठण व तद्नंतर पुणे ते आळंदी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी
सोहळ्या सोबत
पंढरपूर असा एकूण ४८ दिवसांचा प्रवास या वारीतून होतो. वऱ्हाड
प्रांतातील ही एकमेव वारी अनेक वर्षांपासून जात आहे सध्या या दिंडीचा मान माउलींचा
पालखी सोबत विठ्ठल मंदिरात समोरून प्रवेश करणाऱ्या २१ मानाचा दिंड्या न मध्ये १७ वा क्रमांक आहे व अजूनही ही परंपरा कायम आहे
Post a Comment