चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) -
सविस्तरवृत्त असे की, प्रजासत्ताक दिनानिमित्य गुरूवारी सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे यांच्याहस्ते स्थानिक जिल्हा परीषद शाळेत ध्वजारोहन संपन्न झाले. यानंतर पथसंचलन करण्यात आले. यामध्ये चांदुर रेल्वे पोलीसांचाही समावेश होता. पथसंचलनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही करण्यात आले होते. हा कार्यक्रम बघण्यासाठी हजारो मुले- मुली तसेच शहरवासी आवर्जुन उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात एवढी गर्दी असतांना पोलीस सुरक्षा असणे गरजेचे होते. तसेच कार्यक्रमादरम्यान गोंधळाची स्थिती निर्मान होत असतांना संचलन करणाऱ्यांनी तब्बल १० ते १५ वेळा पोलीसांच्या मदतीची विनंती केली. यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगराध्यक्ष, नगरसेवक व विशेष म्हणजे एक महिला पोलीस अधिकारीही उपस्थित होत्या. संचलन करणाऱ्यांनी वारंवार लाऊडस्पीकरवरून विनंती केल्यानंतर केवळ २-३ पोलीस कर्मचारी मैदानात आले असता ते ही एका बाजुला कार्यक्रम बघत उभे होते. शेवटी नाईलाजाने संजलन करणाऱ्यांनीच गोंधळ करणाऱ्यांना काही प्रमाणात नियंत्रीत केले. त्यामुळे पोलीसांचा बेजबाबदारपणा खुद्द उपविभागीय अधिकारी यांनी डोळ्यांनी अनुभवला.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे जज म्हणुन उपस्थित असलेल्या मान्यवरांना सुध्दा चांगल्या पध्दतीने काही कार्यक्रमाचे निरीक्षण करता आले नाही. कार्यक्रमाच्या शेवटी मंचावरील महिला पोलीस अधिकारी, महिला होमगार्ड यांनी स्वत: येऊन गोंधळाला नियंत्रीत केले. जनतेचे रक्षकच भक्षक बनल्याचा आणखी एक हा नमुना सर्वांसमोर आला आहे. वरीष्ठांचे स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसुन येत आहे. नियमांचे कठोरपणे पालन करणारे उपविभागीय अधिकारी हे पोलीस कर्मचाऱ्यांवर नक्कीच कारवाई करतील असे चिन्ह दिसत आले. कारण हा सगळा प्रकार त्यांच्या डोळ्यांसमोरच झाला. त्यामुळे उपविभागीय अधिकारी काय कारवाई करतील याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment