निगडी (पुणे)–

स्वतःला प्रथम सामर्थ्यवान बनवा आणि मग अहिंसेच्या गोष्टी करा; कारण दुबळ्या माणसाच्या तोंडी ‘अहिंसा’ शब्द शोभत नाही. शत्रूला त्याने नमवता येत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते आणि शिवसेना उपनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले. ते ‘क्रांतीवीर सावरकर विचार मंच’ यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. सात्यकी सावरकर हेही उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, देशाच्या सीमा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे तलवारीने आखाव्या लागतात, ‘सुताने’ नव्हे. दुर्दैवाने ७० वर्षांत कुठल्याच राजकीय पक्षाने तसे केले नाही. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शेजारील राष्ट्रातून होणारी घुसखोरी, आतंकवाद आदी अनेक गोष्टी घडत आहेत. हे रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या वेळेला नेहरूंना अनेक पत्रे लिहिली; पण मौजमजेत व्यस्त असणार्या नेहरूंना पत्र गांभीर्याने घेण्याची आवश्यकता वाटली नाही. अनेक वर्षांनी हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आल्यावर हिंदूंच्या आशा पल्लवीत झाल्या; पण त्यांचा प्रवासही काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवून व्हायला लागला.
उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय लोकांनी आता रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे, नाहीतर आज राम गडकरी यांचा पुतळा फोडला, उद्या अनेक क्रांतीकारकांचे पुतळे फोडतील. आजच्या पिढीला फ्रेंच आणि रशियन राज्यक्रांती शिकवली जाते अन् आपल्या अतीउच्च ज्ञान असलेल्या हिंदु संस्कृतीपासून लांब ठेवले जाते. त्यामुळे आज विद्यार्थ्यांना हिंदूंच्या शौर्याचा इतिहास शिकवण्याची आवश्यकता आहे, असेही श्री. पोंक्षे म्हणाले.
Post a Comment