![]() |
फोटो - फाईल |
दुर्लक्षित धोरणामुळे खुलेआम वरली मटका सुरू
आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पोलिसांचा वचकच उरला नसल्याचे दिसून येत आहे.
मटक्याचे पूर्वापार परंपरेने चालत आलेले "ओपन जेऊ देईना अन् क्लोज झोपू देईना‘ हे वाक्य शहरात सत्यात उतरले आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने शहरातील सिनेमा चौक व इतर मुख्य चौकात मटका जोमात सुरू आहे. शहराच्या ठिकाणी सुरू असलेला हा मटका घेणारे एजंट व खेळणाऱ्या मटकाबहाद्दरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांचे पोलिसांसोबत व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे असल्याची चर्चा होत आहे. चांदुर रेल्वे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे संसार या वरली मटक्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. असे असतानाही कुठल्याही प्रकारचे अंकुश या ठिकाणी लावण्यात येत नसल्याचे दिसत आहे. या वरली मटका व्यवसायाच्या ठिकाणी अनेक पोलीस कर्मचारी सुध्दा बसत असल्याचे समजते. शहरातील पोलीस ठाण्यातील शिपाई, बिट जमदार तसेच काही सहाय्यक ठाणेदाराचे मटका वाल्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्याची चर्चा आहे. शहरात मटका कुठे चालतो हे पोलीसांना माहीत असतांनासुध्दा याकडे दुर्लक्ष करीत असुन जनतेचे रक्षक असलेलेच पोलीस अवैद्य धंदेवाल्यांना आश्रय देत आहे पोलीसांच्या अकार्यक्षमतेमुळे मटकाबंदीसाठी आता शहराच्या लोकप्रतिनिधींनीच लक्ष घालण्याची गरज आहे.
Post a Comment