गोवा येथे मतदानानंतर उत्साह वर्धक पणा |
गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान आज शांततेत आणि पोलीस बंदोबस्तात पार पडले. राज्यातील मतदारांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यातील 83 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
राज्यात सकाळी आज 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. जवळपास सर्व मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणच्या किरकोळ घटना वगळता राज्यातील सर्वच ठिकाणी शांततापूर्ण मतदान पार पडले. या मतदानाच्या सुरक्षेसाठी राज्यातील निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचाऱयांना मतदान केंद्राबाहेर तैनात करण्यात आले होते. दरम्यान, या निवडणुकीत मुख्य चुरस ही भाजप, काँग्रेस, आप आणि एमजीपीच्या आघाडीमध्ये असणार आहे.
Post a Comment