BREAKING NEWS

Tuesday, February 7, 2017

२७ उमेदवारांनी केले ३० नामनिर्देशन पत्र दाखल चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला,पळसखेड व घुईखेड जि.प.सर्कल



चांदूर रेल्वे / शहेजाद खाण /-



येत्या २१ फेब्रुवारीला होणाऱ्या अमरावती जिल्हा परिषदच्या पंचवार्षीक निवडणूकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (ता.६) चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला, पळसखेड व घुईखेड जि.प.सर्कल  मधून २७ उमेदवारांनी ३० नामनिर्देशन पत्र दाखल केले.
चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर(अनु.जाती जमाती ) जि.प.सर्कल  मध्ये अ‍ॅड.सुनिता प्रभाकर भगत (जनता दल), आशा सुरेंद्र भोगे (शिवसेना), विजया राजेश पखाले(भाजप),मायावती अशोक भावे (राष्ट्रवादी काँग्रेस),संघमित्रा आनंद भगत(बहुजन समाज पार्टी), रंजना हरिभाऊ गवई(काँग्रेस),संगीता चंदू उके(भारीप-बमसं), पुष्पा देवराव भटकर,(अपक्ष), विजया बाबाराव पाटील(पीपल्स रिपब्लीकन पार्टी) असे नऊ महिला उमेदवारांनी १० नामनिर्देशन पत्र दाखल केले. पळसखेड (अनु.जाती) जि.प.सर्कलमधे पंजाब झाबाजी राऊत (भाजप), नितीन उमाकांत गोंडाणे(काँग्रेस), प्रशांत ओंकार पाटील(भारिप-बमसं), घनराज किसन शेंडे(राष्ट्रवादी कॉंग्रेस),मंदा अभिमान गवई(कॉंग्रेस), चंद्रकांत मारोतराव खडसे(युवा स्वाभिमान पक्ष), देवराव नथ्थुजी करूणाधन(अपक्ष), पुष्पा मधुकर तायडे(शिवसेना) अशा नऊ उमेदवारांनी दहा नामनिर्देशन पत्र दाखल केले. घुईखेड(सर्व साधारण महिला)जि.प.सर्कल  मधे सरीता गजानन शहाडे (जनता दल),रतीका विशाल देशमुख (शिवसेना), सिमा प्रशांत देशमुख(भाजप), राधीका प्रविण घुईखेडकर (काँग्रेस), मनिषा मुकुल  परगणे (भारीप-बमसं), प्रेमा हरिभाऊ ठाकरे (अपक्ष), माधुरी मोहन ठाकरे(भाजप), संगीता देविदास वानखडे (भारतीय कम्युनिस्ट पार्टी ) समता संतोष घाटोळे (भारिप-बमसं) अशा नऊ महिला उमदेवारांनी १० नामनिर्देशन पत्र सादर केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.