BREAKING NEWS

Wednesday, February 22, 2017

भूमी अभिलेखच्या सहा सेवा ऑनलाईन

यवतमाळ- 

  

 भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सहा सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरीकांची सोय होणार आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे नक्कल पुरविणे, मोजणी प्रकरणे, आकारफोड करणे, फेरफार नोंदणी, मिळकत पत्रिकेची पोटविभागणी करून मिळकत पत्रिका स्वतंत्र करणे, भूसंपादनामध्ये रस्ता, रस्ता सेट बॅक, रिझर्वेशन याबाबत शासन, संबंधित प्राधिकारी यांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे आदी सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहे. याबाबतची सविस्तर माहिती yavatmal.nic.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. आपले सरकार वेबपोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वि. ग. घनवट यांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.