BREAKING NEWS

Monday, February 6, 2017

नगरसेवक भरत चौधरी यांचे कुणबी प्रमाणपत्र वैध : - उच्च न्यायालय ** जात पडताळणी कमिटीवर न्यायालयाचे ताशेरे **

कोंढवा  / अनिल चौधरी /-


पुणे महापालिका निवडणुकीत २०१२ मध्ये कोंढवा येथे निवडून आलेले नगरसेवक भरत चौधरी यांच्या कुणबी दाखल्यावर त्यावेळेसचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार मोहम्मद हुसेन इस्हाक खान यांनी कुणबी दाखल्यावर आक्षेप नोंदवला होता. परंतु उच्च न्यायालयाने कुणबी प्रमाणपत्र वैध ठरविले असून, उलट जात पडताळणी कमिटीवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे चौधरी यांना दिलासा मिळाला आहे.उद्याची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे भरत चौधरी यांची पत्नी सीमा भरत चौधरी यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये नगरसेवक भरत चौधरी यांनी पुराव्यासह हि माहिती दिली.
        कोंढवा खुर्द प्रभाग क्रं.६३ मधून सन २०१२ रोजी महापालिका निवडणूक नगरसेवक भरत चौधरी यांनी नागरिकांचा मागास परवर्ग मधून लढविली होती. त्यावेळी ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.निवडणूक लढण्यापूर्वी चौधरी यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कमिटी क्रं.३ यांच्याकडून प्रमाणपत्र मिळवले होते.मात्र या प्रमाणपत्रावर त्यावेळेसचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पराभूत झालेले उमेदवार मोहम्मद हुसेन इस्हाक खान यांनी चौधरी यांच्या प्रमाणपत्रावर न्यायालयात तक्रार नोंदविली होती. सदर प्रकारणातील चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने विभागीय जात पडताळणी कमिटी क्रं.३ कडे दिले होते. यावर पुनश्च सुनावणी घेण्यात आली त्यावेळी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी कमिटी क्रं.३ ने भरत चौधरी यांचे जाती डाव्या बाबतचे सर्व पुरावे अमान्य करुण ,१३ ऑगस्ट २०१५ रोजी ते अवैध ठरविण्यात आले होते.कमिटीच्या निर्णयानुसार पालिका आयुक्त यांनी भरत चौधरी यांचे नगरसेवक भरत चौधरी यांचे नगरसेवक पद रद्द केले.हा निर्णय झाल्यानंतर जाती पडताळणी कमिटी क्रं.३ च्या निर्णया विरुद्ध भरत चौधरी यांनी उच्च न्यायालयात ८७५९/२०१५ तक्रार दाखल केली.या प्रकरणाची सखोल चोकशी करुण न्यायमूर्ती आर.एम.बोर्डे व ए.एस.गडकरी यांनी ३ फेब्रुवारी २०१७ दिलेली कागदपत्रे ग्राह्य असल्याचे नमूद करत १३ ऑगस्ट २०१५ चा जाती प्रमाणपत्र पडताळणीचा निर्णय अमान्य केला व कमिटीवर कडक शब्दात उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.३० पुराव्यांवर कमिटीने ढोबळ कारणे दिली असल्याचे हि ताशेरे कमिटीवर ओढण्यात आले.
नगरसेवक भरत चौधरी यांच्या वतीने सिनियर कौन्सिल वाय.एस.जागीरदार , सिनियर कौन्सिल आर.एस.आपटे व अॅड.मानस शिंदे यांनी उच्च न्यायालयात काम पाहिले.
उच्च निर्णय पडून असल्यामुळे २०१७ च्या वर्षीची निवडणूक ण लढवण्याचा विचार भरत चौधरी यांनी घेताला होता. मात्र शिवसेनेचा त्यांच्यावर पहिल्यापासून विश्वास होता त्या अनुशंगाने पक्षाने त्यांच्या पत्नी सीमा भरत चौधरी यांना सर्वसाधारण मधून उमेदवारी दिली आहे.

माझ्यावर कलंक लावण्याचा प्रयत्न केला मात्र माता-भगिनींचा आशीर्वाद व कुलस्वामीचे पाठबळ असल्यामुळे,विरोधकांचे मनसुबे उधळले. मात्र माझ्या परिसराचा विकास खुंटला गेला याचे मला दु:ख होतेय.पक्षाने माझी पत्नी सीमा चौधरी यांना तिकीट दिले आहे त्याच सोने मी नक्कीच करणार असे भरत चौधरी यावेळी म्हणाले.
   

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.