महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ९७ दिंड्या दाखल
चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-
१३ व्या शतकातील श्री.संत बेंडोजी महाराज यांच्या संजिवन समाधीचे दर्शन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविक भक्तांनी आज घेतले. आजच्या भव्यदिव्य दहिहांडी महोत्सवात लाखो भक्त सामिल झाले होते. श्री.संत बेंडोजी महाराजाच्या ऐतिहासीक पालखी सोहळयात संपूर्ण महाराष्ट्रातील ९७ दिंड्या सामील झाल्या. लेझीम, बँड, भजने व हरिनामाच्या गजराने संपूर्ण घुईखेड नगरी दुमदूमली होती.
तालुक्यातील घुईखेड येथील श्री.संत बेंडोजी महाराजाच्या संजिवन समाधी महोत्सवाला २८ जानेवारी ला प्रारंभ झाला. तिर्थ व कलश स्थापना करून श्री संत बेंडोजी महाराजांचा लघुरूद्राभिषेक संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी सलग सात दिवस हभप गोदावरीबाई बंड यांनी आपल्या अमृतवाणीतुन सुंदर भागवत प्रवचण केले. दररोज सामुदायिक प्रार्थना, काकडा आरती, ग्रामसफाई, रामधुन, किर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तर दररोज रात्री हभप नामदेव महाराज, हभप मोहोड महाराज, हभप विजय महाराज गव्हाणे, योगेश महाराज खवले यांचे हरिकिर्तन झाले. त्यांचा आनंद भाविकांनी लुटला. बजरंग मंडळ, गुरूदेव सेवा मंडळ व बाल भजनी मंडळ, घुईखेड, भजनी मंडळ, पळसखेड, वारकरी भजनी मंडळ जावरा, वारकरी महिला भजनी मंडळ, घुईखेड, वारकरी भजनी मंडळ निमगव्हाण यांचा खंजेरी भजनाचा कार्यक्रम पार पडला.या संपूर्ण सप्ताहात भाऊसाहेब घुईखेडकर, आप्पासाहेब काकडे, श्रीमती कमलाबाई सवाने, हरिभाऊ ठाणेकर, किशोर कडवे, भिमराव वानखडे, संजय कुचेवार, त्रिलोक टावरी आदी दात्यांनी अन्नदान केले.
काल्याचे किर्तन व महाप्रसाद
विविध साहित्यांची दुकाने सजली होती. यात्रेकरू संसारपयोगी वस्तुची खरेदी करतांना दिसले. तर अनेकजन यात्रेत आकाश पाळण्यासह इतर मनोरंजनाच्या खेळांचा आनंद घेतांना दिसले.
पोलीसांचा चोख बंदोबस्त
Post a Comment