BREAKING NEWS

Sunday, February 5, 2017

जनता दलातर्फे घुईखेड सर्कलमधुन सौ. सारिकाताई शहाडे यांनी दाखल केल नामांकन

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )


महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा रणसंग्राम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या मिनी विधानसभेची दंगल सुरू झाली आहे. अशातच जिल्हा परीषदेचे २१ फेब्रुवारी रोजी तालुक्यात मतदान होणार आहे. तालुक्यात घुईखेड, पळसखेड व आमला असे तीन जिल्हा परीषद सर्कल आहे. यामध्ये रविवारी जनता दल (सेक्युलर) तर्फे दुसरा नामांकन घुईखेड सर्कलमधुन सौ.सारिकाताई गजानन शहाडे यांनी दाखल केला.
        नामांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेला प्रारंभ झाला असतांनासुध्दा शुक्रवार पर्यंत एकही नामांकन अर्ज दाखल झाला नव्हता. शनिवारी जनता दल (सेक्युलर) च्या आमला विश्वेश्वर सर्कल मधील उमेदवार अँड. सौ.सुनीताताई प्रभाकर भगत यांनी प्रथम नामांकन जि.प. निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. शनिवारी हा केवळ एकमेव नामांकन नामांकन दाखल झाला होता. यानंतर रविवारी पुन्हा जनता दलातर्फे दुसरा नामांकन रविवारी घुईखेड सर्कलमधुन सौ.सारिकाताई गजानन  शहाडे यांनी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जि.प.निवडणुक निर्णय अधिकारी चांदूर रेल्वे यांच्याकडे दाखल केला. त्यामुळे आतापर्यंत जनता दलातर्फे २ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आज सोमवार नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असुन आज सर्व पक्षांच्या उमेदवारांसह, अपक्षांचीही चांगलीच गर्दी होणार आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.