BREAKING NEWS

Sunday, February 5, 2017

मानसिक तनावात आहेत न.प. व जी.प.चे शिक्षक - शिक्षणाव्यतीरीक्त अनेक सरकारी कार्याचा त्यांच्यावर बोजा

अचलपूर  /  श्री प्रमोद नैकेले /-


 एकीकडे शासन सर्व शिक्षा अभीयान अन्तर्गत खर्च करत आहे की शाळेत विद्यार्थ्यांचा  शैक्षणिक विकास होवून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती व्हावी. परंतु काही ठिकाणी  शिक्षाकांना शैक्षणिक कार्य सोडून शौचालय चा सर्वे करने,मतदार यादी बनवणे, बी एल ओ चे काम, भटक्या मुलांचा शोध घेवुन त्यांना तेथे जावून  शिकवणे त्यांना पोषण आहार पोहचवणे असे  कार्य करावे लागते ज्यामुळे नगरपालिका व जिल्हापरीषद च्या शाळेत शिकत असलेल्या मुलांचे नुकसान होत आहे. सध्या चाचणी परीक्षा समोर आहे अशात  नियमित पणे शाळेत  शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. न.प .जी .प. शाळेमध्ये तसेही शिक्षाकांची कमी आहे. त्यात या नविन आदेशानुसार शिक्षक मानसिक तानावातून जात आहेत. शासन द्वारा शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांनकरीता इंडस बाल कामगार प्रकल्प अंतर्गत जागोजागी इंडस च्या संक्रमण शाळा सुरू केल्या ज्यामध्ये 30 ते 40 विद्यार्थ्यांची नोंद असून प्रत्यक्षात चार ते पांच मुले या शाळेत उपस्थित राहतात याकरिता एका शाळेत चार चार कर्मचा-यांची नियुक्ति केलेली आहे.  अचलपूर तहसिल अंतर्गत चालणा-या प्रकल्प च्या केंद्र शाळेमध्ये केंद्र प्रमुख व प्रकल्प अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे कारणाने शासनाच्या या योजना केवळ कागदोपत्री चालत आहेत. शासनाचा उद्देश होता की शाळेत जात नसलेले विद्यार्थ्यांना संक्रमण शाळेतून शिक्षण प्रवाहात आणाण्याकरीता  प्रकल्प  केंद्र चे शिक्षकांनी प्रयत्न करावे ज्यामुळे शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांचे  शैक्षणीक नुकसान होणार नाही.तसेच आता जे न प जी प चे शिक्षक मानसिक तनावातून जात आहेत त्यांना सुध्दा  त्रास झाला नसता मात्र  शासनाने शिक्षकांना अतीरिक्त काम देवुन शिक्षणाची ऐसीतैसी करून शिक्षकांना  परेशानी मध्ये टाकले आहे.

फोटो - फाईल 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.