BREAKING NEWS

Saturday, February 11, 2017

जानकीबाई देशमुख कन्या शाळेच्या गाईड शिक्षीका उषा जावळे मेडल आँफ मेरीट अवार्डने सन्मानित

अचलपूर / प्रमोद नैकेले /--


शिक्षकपेशा हा सन्माननीय आहे सेवा करतांना ती कशी केली याची पावती एकतर त्यांचे विद्यार्थी देतात नाहीतर शिक्षण विभाग अथवा संबधित विभाग त्यांचा सन्मान करतात अशाच स्थानीक श्रीमती जानकीबाई देशमुख कन्या शाळेच्या गाईड शिक्षीका उषा जावळे यांना त्यांच्या गाईड विभागाने मेडल आँफ मेरीट अवार्ड देवून सन्मान केला.
     उषा सीतारामजी जावळे स्थानीक जानकीबाई कन्या शाळेच्या शिक्षीका त्यांनी प्रामाणिक पणे आपली सेवा दिली.शाळेमध्ये त्यांना गाईड हा विषय मिळाला त्यामध्ये सुध्दा त्यांनी काटेकोर पणे आपल्या विद्यार्थ्यींनींना मार्गदर्शन केले व सर्व प्रकारच्या गाईडच्या अभ्यासक्रमापासून अवगत करून दिले.त्यांच्या याच कर्तृत्वशिलतेची आठवण म्हणून स्काउटगाईड विभागाने 29 जानेवारी ला गुरूकुंज मोझरी येथे संपन्न झालेल्या महोत्सवात त्यांच्या कृतीशिल व चांगल्या सेवेबद्दल मेडल आँफ मेरीट अवार्ड देवून सन्मान केला.त्या सध्या सेवानीवृती झाल्या आहेत पण या सन्मान प्राप्ती मध्ये शाळेच्या व्यवस्थापक मंडळाचे सहकार्य,शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच तालूक्यातील सर्व स्काउट गाईड शिक्षक व शिक्षिका यांचे आपल्याला नेहमीच प्रोत्साहन व सहकार्य लाभले असे त्यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.