BREAKING NEWS

Friday, February 10, 2017

*खाजगी ट्रॅव्हल्स मालकांची मनमानी प्रवाश्यांची आर्थिक लुट* *ट्रॅव्हल धारकांवर नाही प्रशासनाचा अंकुश*


प्रमोद नैकेले /---
अचलपूर:-


अचलपूर परतवाडा जुळ्या शहरातील वाहतूक व्यवस्था जवळपास रामभरोसे आहे.महामंडळाच्या बसेस आगारात ट्रॅव्हल आगाराजवळ असे चित्र पाहायला मिळत आहे.ट्रॅव्हल एजंट आगारातून प्रवाशांना घेवुन जातात.प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे शिवाय काही साटेलोटे असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.
      अशा प्रकारे खाजगी वाहतुकीचे हे प्रकार जुळ्या शहरात चालले असतांना ट्रॅव्हल च्या प्रवास शुल्कावर सुध्दा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.प्रवास शुल्क आकारतांना काही निश्चित दरांची आकारणी केलेली नाही.परतवाडा शहरातील विविध खाजगी ट्रव्हल्स चालकाकङून सण उत्सवात बाहेरगावी जाणा-या प्रवाश्यांची होणा-या आर्थीक पिळवणूकीवर शासनाने अंकुश लावावा.या दरम्यान तिकिटाच्या दरात दुप्पटीने वाढ केल्या जाते.प्रवाशयाची होणारी आर्थीक लूट कधी थांबणार? परतवाङा बस आगारात बाहेरगावासाठी प्रवाश्याची संख्या लक्षात घेऊन बसेसची संख्या वाढविण्यात येणार का ? शासन खाजगी ट्रव्हल्स चालकाची मनमानी कारभार थांबविण्यासाठी तिकीटाची दरे निशचीत करणार का ?  पुढच्या महिन्यात होळीच्या सणावर खाजगी ट्रव्हल्स चालकाकङून प्रवाशांच्या आर्थीक लूटच्या प्रकाराला शासन आळा लावणार का ? आणि सण ऊत्सवात शोभेची वस्तू ठरणारी ऑनलाईन तिकीटाची सुविधा कधी सुरळीत होणार ? असे अनेक प्रश्न प्रवाशी वर्गाकङून होत आहे याकङे सर्वजन लक्ष देऊन दखल घेणयाची मागणी होत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.