BREAKING NEWS

Wednesday, February 8, 2017

एकही अर्ज अवैध नाही - २७ उमेदवारांचे ३० नामनिर्देशन पत्र कायम


चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला, पळसखेड व घुईखेड जि.प.सर्कल 



चांदूर रेल्वे / शहेजाद खान - 


अमरावती जिल्हा परिषदच्या निवडणूकीत दाखल झालेल्या नामनिर्देशन त्रांची आज छाननी पार पडली.त्यामध्ये एकही अर्ज अवैध झाले नाही.चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर, पळसखेड व घुईखेड जिल्हा परिषद सर्वâल मध्ये २७ उमेदवारांचे ३० नामनिर्र्देशन पत्रे वैध ठरले आहे.
येत्या २१ फेब्रुवारीला होणाऱ्या  अमरावती जिल्हा परिषद पंचवार्षीक निवडणूकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (ता.६) चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला, पळसखेड व घुईखेड जि.प.सर्कल  मधून २७ उमेदवारांनी ३० नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर(अनु.जाती स्त्री  ) जि.प.सर्कल मध्ये अ‍ॅड.सुनिता प्रभाकर भगत (जनता दल सेक्युलर), आशा सुरेंद्र भोगे (शिवसेना), विजया राजेश पखाले(भाजप), मायावती अशोक भावे (
राष्ट्रवादी काँग्रेस), संघमित्रा आनंद भगत (बहुजन समाज पार्टी), रंजना हरिभाऊ गवई(काँग्रेस),संगीता चंदू उके (भारीप-बमसं), पुष्पा देवराव भटकर,(अपक्ष), विजया बाबाराव पाटील(पीपल्स रिपब्लीकन पार्टी) रिंगणात आहे. पळसखेड (अनु.जाती) जि.प.सर्कल मध्ये पंजाब झाबाजी राऊत (भाजप), अ‍ॅड.सुनित ज्ञानेश्वर घोडेस्वार(भाजप), नितीन उमाकांत गोंडाणे(काँग्रेस), प्रशांत ओंकार पाटील(भारिप-बमसं), धनराज किसन शेंडे(राष्ट्रवादी कॉंग्रेस ), मंदा अभिमान गवई (अपक्ष), चंद्रकांत मारोतराव खडसे (युवा स्वाभिमान पक्ष), देवराव नथ्थुजी करूणाधन(अपक्ष), पुष्पा मधुकर तायडे(शिवसेना) रिंगणात आहे. घुईखेड(सर्व साधारण महिला)जि.प.सर्वâल मध्ये सरीता गजानन शहाडे (जनता दल सेक्युलर), रतिका विशाल देशमुख (शिवसेना), सिमा प्रशांत देशमुख(भाजप), राधीका प्रविण घुईखेडकर (काँग्रेस), मनिषा मुकुल  परगणे (भारीप-बमसं), प्रेमा हरिभाऊ ठाकरे (अपक्ष), माधुरी मोहन ठाकरे(भाजप), संगीता देविदास वानखडे (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), समता संतोष घाटोळे (भारिप-बमसं) रिंगणात आहे. १३ फेब्रुवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे. त्यानंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार हे स्पष्ट होणार आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.