BREAKING NEWS

Wednesday, February 8, 2017

श्रीकृष्ष्ण हायस्कूल तर्फे विद्यार्थीनींना सायकल वाटप ईश्वर चिठ्ठीने केले ९ सायकलीचे वाटप


श्रीकृष्ण हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

चांदूर रेल्वे / शहेजाद खान - 


परगावावरून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या  विद्यार्थींनींना जाने-येणे करणे सुलभ व्हावे यासाठी श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आमला विश्वेश्वर व दानदात्याच्या मदतीने नऊ सायकलचे वाटप करण्यात आले. सामाजिक जाणीव ठेवत हा स्तुत्य उपक्रम शाळा मागील विस वर्षापासून अखंडीतपणे राबवित आहे हे विशेष!
शिक्षणासाठी बाहरेगावावरून येणाऱ्या  वर्ग ५ ते ११ च्या विद्यार्थीनींसाठी नऊ सायकल ची सोडत ईश्वर चिठ्ठीने काढण्यात आली. श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आमला विश्वेश्वर चे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तर्फे  वर्ग १०वी च्या शितल सुरेश जाधव (सालोरा खुर्द), संस्था उपाध्यक्ष दीपक केशवराव खेरडे तर्फे स्व.केशवराव खेरडे यांंच्या स्मृती प्रित्यर्थ वर्ग १०वीच्या प्रतिक्षा मोहन गणवीर (टेंभूर्णी), पर्यवेक्षिका भारती रंगनाथजी अवधुतकर तर्फे  स्व.रंगनाथजी अवधुतकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ वर्ग ७ वी च्या दिव्यानी गोपीचंद गजबे (जळका जगताप), कला विभागचे प्रा.प्रसेनजित तेलंग, प्रा.ललित जावरकर व प्रा.आशिष निमकर यांच्या तर्फे  वर्ग ११ वी कला च्या काजल सुधाकर सयाम (कारला),मुकींद जनार्दनपंत तिरथकर यांच्या वतीने स्व.जनार्दनपंत व स्व.लक्ष्मीबाई जनार्दनपंत तिरथकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ वर्ग ७ वीच्या प्रणिता राजेश जाधव (पाथरगाव),रिलायन्स जि.ओ.कम्युनिकेशन लि.रायपूर चे मॅनेजर पंकज सोमेश्वर जिरापूरे, जळका जगताप यांच्या वतीने वर्ग१० वी च्या कल्पना भालचंद्र चव्हाण(कारला), देविदास नंदरधने, आमला विश्वेश्वर यांच्या वतीने स्व.बापुराव नंदरधने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दीपाली निलेश कांबळे (पाथरगाव), अचलराव बेलसरे यांच्या तर्फे मधुकर भिमराव बेलसरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वर्ग ८ वीच्या मयुरी सुरेश वासनिक (जळका जगताप), सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पा मधुकर तायडे यांच्या वतीने ९ वीच्या स्नेहा वसंत जाधव (सालोरा खुर्द) या नऊ विद्यार्थींनींना मान्यवराच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव मधुकरराव नेरकर, संचालक प्रल्हादराव बकाले, पुंडलिकराव बकाले, माणिकराव केने, बापु वानखडे, शंकरराव मालधुरे, अतुल बकाले, देविदास नंदरधने, माणिक महाराज, विनोद बकाले, किशोर मालखेडे, रंगराव पाटील, गोपाळ हांडे, मुकींद तिरथकर, गोपाळ यावले, एस.के.बहातकर, संजय खेरडे ,गोपाळ बकाले, वसंत पवार, श्रीकृष्ण बकाले, ज्ञानेश्वर खेरडे, प्राचार्य सुरेश देवळे, पर्यवेक्षिका भारती अवधुतकर यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.