चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
या प्रशिक्षणाला चांदूर रेल्वेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे , जातपडताडणी कार्यालय, अकोला येथील अध्यक्ष तिटकरे, चांदूर रेल्वे तहसीलदार बी.ए.राजगडकर उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे यांनी प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार श्रीकांत विसपुते यांनी प्रोजेक्टर व्दारे मतदान यंत्र व त्याच्याशी संबधित साहित्याची माहिती दिली. तसेच सीआरसी व मतदान यंत्राचे सिलींगची कारवाईचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. पोस्ट बॅलेट पेपरची माहिती देण्यात आली व प्रत्यक्ष मतदान करतांना भारतीय निवडणूक आयोगकडील मतदान ओळखपत्र अथवा अन्य पुरावे सादर करण्याबाबतची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणाला नायब तहसीलदार दिनेश बढीये, प्रभाकर पळसकर, प्रविण देशमुख यांच्यासह सर्व महसुल कर्मचारी व क्षेत्रीय निवडणूक अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व महिला मतदान कर्मचारी उपस्थित होते.
\
फोटो - sampal
Post a Comment