शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचा परखड प्रश्न
जर भ्रष्टाचाराचे आरोप असेलेले शरद पवार यांंना पद्मविभूषण दिला जातो, तर ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचा होम केला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना केंद्रशासन भारतरत्न का देत नाही, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. येथील महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या समारोपाची सभा १८ फेब्रुवारी या दिवशी वांद्रे येथील बीकेसी पटांगणात आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे राज्यातील अनेक मंत्री, खासदार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment