चांदुर रेल्वे- (शहेजाद खान .)
विधानसभेची सेमीफायनल
समजल्या जाणाऱ्या राज्यातील २५ जिल्हा
परिषद निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. तालुक्यात २१ फेबु्रवारी रोजी तीन सर्कलमध्ये मतदान होणार आहे. अशातच शुक्रवारपर्यंत एकही नामांकन अर्ज दाखल झाला नव्हता. शनिवारी सर्वात प्रथम नामांकन जनता दल (सेक्युलर) तर्फे अँड सौ. सुनीताताई प्रभाकर भगत यांनी दाखल केले असुन सोमवारी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा रणसंग्राम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या मिनी विधानसभेची दंगल सुरू झाली आहे. अशातच जिल्हा परीषदेचे २१ फेब्रुवारी रोजी तालुक्यात मतदान होणार आहे. तालुक्यात घुईखेड, पळसखेड व आमला असे तीन जिल्हा परीषद सर्कल आहे. या निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच नामांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेला प्रारंभ झाला असतांनासुध्दा शुक्रवार पर्यंत एकही नामांकन अर्ज दाखल झाला नव्हता. शनिवारी जनता दल (सेक्युलर) च्या आमला विश्वेश्वर सर्कल मधील उमेदवार अँड. सौ.सुनीताताई प्रभाकर भगत यांनी दनता दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रथम नामांकन जि.प. निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले. शनिवारी हा केवळ एकमेव नामांकन नामांकन दाखल झाला. जनता दलाच्या उमेदवार अँड. सुनीताताई भगत ह्या उच्चशिक्षीत असुन त्यांनी बी.ए.एल.एल.बी. , एल.एल.एम चे शिक्षण पुर्ण केले आहे. अशा उच्चशिक्षीत महिलेच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांत नवचैतन्य पसरले आहे. सोमवारी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असुन सोमवारी सर्व पक्षांच्या उमेदवारांसह, अपक्षांचीही गर्दी उसळणार आहे.
Saturday, February 4, 2017
जनता दलाच्या अँड. सौ.सुनीताताई भगत यांनी दाखल केला सर्वप्रथम नामांकन जि.प. निवडणुक दंगल
Posted by vidarbha on 8:28:00 PM in चांदुर रेल्वे- (शहेजाद खान .) | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment