रिसोड येथे आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मोर्चा. निलंबित झालेल्या सर्व आमदारांचे निलंबन मागे घ्या- युवक काँग्रेस कमिटी
Posted by
vidarbha
on
6:55:00 PM
in
जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन जैन -
|
जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन जैन -
वाशिम
-
कर्जमाफी विरोधात २२मार्च ला महाराष्ट्र विधिमंडळात आमदार अमित झनक व इतर १९ आमदार ९ महिण्याकरिता हुकूमशाही पद्धतीने निलंबन करण्यात आले त्याचा निषेध म्हणून दिनांक २४ ला आमदार अमित झनक यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पासून ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.रिसोड विधानसभा युवक काँग्रेस रिसोड काँग्रेस सोशल मीडिया.एन. एस. यु आय.च्या वतीने निषेध आंदोलन करून निवेदन देण्यात आले.गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफिशिवाय पर्याय नाही परंतु शेतकऱ्याची व्यथा विधिमंडळात मांडणाऱ्या १९ आमदारांना निलंबित करून या सरकारला शेतकऱ्याचे काहीही घेणे देणे नाही अशे दाखवून दिले आमदारांचे निलंबन त्वरित मागे, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .निलंबन मागे न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू आणि होणाऱ्या परिनामास शासन जबाबदार राहील असे युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाबुराव शिंदे यांनी सांगितले.प्रसंगी बाबूराव शिंदे,संतोष बाजड,बबन गारडे,प्रकाश वायभासे,अंकुश देशमुख,शामराव उगले,सुखदेव मोरे,बाबाराव ढोणे,रवी बोडखे,योगेश गारडे, गोपाल मोरे,चेतन पाटील,राहुल भुतेकर,संदीप खराटे व बहुसंख्य कार्यकते हजर होते.
Post a Comment