वाशिम / महेंद्र महाजन जैन /-
मालेगांव तालुक्यातील किन्हीराजा येथे पर्यटन विकास योजने अंतर्गत कामे चालु अाहेत मात्र त्या ठिकाणी संबंधित कामाची माहीती दर्शविणारे कोणत्याच प्रकारची फलके न लावल्यामुळे ग्रामस्थामध्ये कामाच्या दर्जा बाबत शंका निर्माण होत असुन काम निष्कृष्ट दर्जाचे होत असलेल्या चर्चेला पेव फुटले आहे.तसेच सदर कामाला निधी किती आला ? कामाचा कालावधी किती ? व या निधी आणण्यासाठी साठी कोणी प्रयत्न केले ? या बाबत कुठलीच माहीती नाही.योजनेचे नांव करारनामा ठेकेदाराचे नांव संबंधित यंत्रनेचे नाव कामाची अंदाजे किंमत काम पुर्ण करण्याचा कालावधी व इतर माहीती दर्शविणारा फलक न लावताच सदर कामे पुर्ण करण्याचा झपाटा चालु आहे.तसेच सदरील होत असलेले काम हे उत्कृष्ट होत आहे की निष्कृष्ट दर्जाचे होत आहे हे निदर्शनास येण्यासाठी कामाच्या प्रदर्शनी भागात अंदाजपत्रकाचा फलक लावण्यात यावा,अशी मागणी होत आहे.
Friday, March 24, 2017
किन्हीराजा मध्ये अंदाजपत्रक न लावताच विकासकामे शुरू
Posted by vidarbha on 6:57:00 PM in वाशिम / महेंद्र महाजन जैन /- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment