महाराष्ट्र शासन मंत्रालय येथे शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. रामेश्वर हरिभाऊ भुसारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी गारपीटमुळे त्याच्या पॉलिहाऊसचे नुकसान झाले होते. त्याचे रिपीट दाखल करण्यासाठी असेच त्याच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तो मंत्रालयात आला होता. नेमके कुठल्या कारणाने त्याला मारहाण झाली आहे हे अजून कळू शकलेले नाही. मात्र, मारहाण झालेल्या शेतकऱ्याने पोलिसात तक्रारीसाठी धाव घेतली आहे. हा शेतकरी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यासाठी आला होता. पण पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नाही असे सांगितले. शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अडून राहीला. त्यानंतर पोलिसांनी जबरदस्ती करून आपल्याला बाहेर काढले आणि मग लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या शेतकऱ्याला माध्यमांशी बोलण्यापासून सुद्धा पोलिसांकडून मज्जाव केला जात होता. तक्रार दाखल करून घेण्यास पोलीसांनी नकार दिला. २०१५ साली गारपीटेची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याने भुसारे यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारहाण करत मंत्रालयाच्या बाहेर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे नेण्यात आले त्याचे शासकीय दवाखानात उपचार करण्यात येत आहेत. माध्यमांचे प्रतिनिधी जखमी शेतकऱ्याशी बोलत असताना पोलिसांनी दया दाखविण्याचा प्रयत्न करीत त्याला आता उपचार घेणे गरजचे आहे हे लोक त्याला अडवत आहेत. त्यांची तक्रार घेण्यात येईल. कोणी मारलं... कोणी मारहाण केली. तुम्ही होतात का ? तिकडे ! असे प्रश्न पोलिसांनी उपस्थित केले. मी तिथे बसलो, इथे बसता येत नाही, साहेब निघून गेले, जो टाइम आहे त्या नंतर चा विषय राहिला असता, मला निर्णय मिळाला शिवाय मी येथून जाणार नाही हा माझा विषय झाला. त्यावर सुरक्षारक्षक पोलिसांनी जबरदस्ती मला मारहाण केली. असे रामेश्वर भुसारे यांचे म्हणणे आहे.
मंत्रालयात पोलिसांसोबत अरेरावी करताना पोलीस कर्मचारी यांना दातांचा चावा घेत असताना धक्का दिल्याने त्या व्यक्तीच्या दातातून रक्त आले आहे, दात तुटला नाही आहे, कोणीही त्याला मारले नाही.
मनोज कुमार शर्मा
डीसीपी झोन -1 मुंबई
Post a Comment