मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
19 आमदारांच्या निलंबनानंतर राजकीय समीकरणांवर भाजपाच्या कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आणि भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाने राजकीय डावपेचांवर चर्चा केली. काँग्रेसचे 15 आणि राष्ट्रवादीचे 14 आमदार भाजपाच्या संपर्कात आहे. या आमदारांना आता पक्षात घ्यायचे की मध्यवर्ती निवडणूकांना सामोरे जावे, याबद्दल चर्चा करण्यात आली. या 30 पैकी 22 आमदार मध्यवर्ती निवडणूकीमध्ये पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे. याबाबत झालेली चर्चा नवी दिल्लीवर कळविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कळते. भाजपाला एकला चलो रे पुढे ठेवायचे असल्याने शिवसेनावर मात करण्यासाठी पुढची व्युवरचना केली जात आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आज भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेच्या वर्तणुकीवर नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष टोकाला जाण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेच्या या विरोधी भुमिकेमुळे खुद्द मुख्यमंत्रीही वैतागले असल्याचे समजते आहे.
Friday, March 24, 2017
भाजपा मध्यवर्ती निवडणूकीसाठी तयार ? सूत्रांची माहिती
Posted by vidarbha on 7:05:00 PM in मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment