यात प्रथम बक्षीसाचे मानकरी यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील शेतकरी रवींद्र बादलसिंग ताड ठरले. तर द्वितीय बक्षीसाचे मानकरी दिग्रस तालुक्यातील धानोरा (खु) येथील विनोद नागोराव जाधव, तर तृतीय बक्षीसाचे मानकरी पुसद तालुक्यातील मारवाडी (बु.) येथील बबन लिंबाजी गडदे हे ठरले.
या स्पर्धेत शेतीवर आधारीत उद्योग, कृषी निगडीत जोडधंदे, पिके, बहुपिक पद्धती, आंतरपिके, मनोधैर्य वाढविण्यासाठी उपाय, किड नियंत्रण, माती परीक्षण, विमा अशा शेती आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्नोत्तरे या स्पर्धेत विचारण्यात आली होती. ही स्पर्धा १ ते १० सष्टेंबर २०१६ या दरम्यान घेण्यात आली होती. या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. निवड करण्यात आलेल्या विजेत्यांना अनुक्रमे प्रथम दहा हजार, द्वितीय सात हजार, तर तृतीय पाच हजारांचे बक्षीस 1 मे 2017 रोजी महाराष्ट्र दिनी पालकमंत्री यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांत जागृती व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातील एक उपक्रम म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक निगडीत ‘बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरे स्पर्धा १ ते १० सप्टेंबर २०१६ या कालावधीत घेण्यात आली होती.
स्पर्धेचे मुल्यमापनासाठी उत्तरपत्रिका तालुकास्तरीय समितीमार्फत त्यांची तपासणी केल्या गेल्या आहे. यात सर्वाधिक गुण असलेल्या २१ स्पर्धकांची नावे जिल्हास्तरावर पाठविण्यात आली होती. जिल्हास्तरावर बळीराजा चेतना अभियानकडून लकी ड्रॉ पद्धतीने अंतिम तीन शेतकरी स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.
Post a Comment