जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन जैन
वाशीम -
शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल विविध संघटनेच्या वतीने निलेश सोमाणी यांचा भावपुर्ण सत्कार करण्यात आला. सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या मारवाडी युवा मंचच्या वतीने स्थानिक मंत्री पार्क येथे आयोजीत मंचच्या सर्वसाधारण सभेत सोमाणी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून भावपुर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी आशिष हुरकट, शैलेश सोमाणी, अध्यक्ष निलेश राठी, सचिव प्रसाद अग्रवाल, कोषाध्यक्ष सौरभ गट्टाणी, नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष मंत्री, शंतनु सिसोदीया, उमेद खंडेलवाल, दिपक दागडीया, लकी अग्रवाल, शर्मा समवेत मंचचे सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक शर्मा सायकल येथे सायकलस्वार ग्रुप व मित्रपरिवाराच्या वतीने सोमाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मित्रपरिवाराचे संदीप पिंपळकर, डॉ. दिपक ढोके, अरविंद उचित, सायकलस्वार ग्रुपचे प्रा. श्रीनिवास व्यास, अरविंद उलेमाले, आदेश कहाते, दिलीप मेसरे, संतोष आमले, समाधान गिर्हे समवेत पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका अध्यक्ष कृष्णा चौधरी व राजु कोंघे यांच्या हस्ते सोमाणी यांचा भावपुर्ण सत्कार करण्यात आला. अमरावती येथे जेसीआय, डॉ. गोविंद कासट मित्र मंडळ व भारतीय जैन संघटनेच्या वतीनेही निलेश सोमाणी यांचा शाल, श्रीफळ देवून भावपुर्ण सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याला लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई, डॉ. गोविंद कासट, प्रा. सुभाष गवई, सुदर्शन जैन, प्रदीप कासट, डॉ. दिपक ढोके, डॉ. हरिष बाहेती, सुरेशचंद्र कर्नावट आदींची उपस्थिती होती. श्रीमती गवई यंाच्या हस्ते सोमाणी यांचा शाल, श्रीफळ, जैन संघटनेच्या वतीने सुदर्शन जैन यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मोत्याची माळ तसेच जेसीआय वाशीमच्या वतीने तापडीया ओंकार तापडीया, राजेश सोमाणी, सौ. सिमा सोमाणी व जेसीआय पदाधिकार्यांंच्या उपस्थितीत भावपुर्ण सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याला ऍड. सौ. भारती सोमाणी यांनाही गौरविण्यात आले.
--------------------------------------------------------
--------------------------------------------------------
Post a Comment