BREAKING NEWS

Thursday, March 23, 2017

*मालेगाव येथे काँग्रेस-राष्ट्रवादी चा रस्ता रोको मोर्चा**आमदार अमित झनक निलंबनाचा निषेध*


जिल्हा प्रतिनिधि  / महेन्द्र महाजन जैन
वाशिम :-



    काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांनी शेतकर्यांना कर्जमाफी मिळालीच  पाहिजे, अशी मागणी केल्याने 9 काँग्रेस  व  10 राष्ट्रवादी काँग्रेस  आमदारांचे 31 डिसेंबर पर्यंत निलंबन केल्याच्या निषेधार्थ मालेगाव येथे काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकार्यानी  रस्ता रोको करून तहसिलवर मोर्चा  काढला.
विधिमंडळात शेतकरी कर्जमाफीसाठी मागणी केल्याने विरोधी पक्षाच्या तब्बल 19 आमदारांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली त्यात रिसोड मतदार संघाचे काँग्रेस  आमदार अमित सुभाषराव झनक यांना निलंबित करण्यात आल्याने काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकार्यानी दि 23 मार्चला सकाळी 11 वाजता शेलुफाट्यावर रस्ता रोको केला   तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रचंड घोषणाबाजी करून  निषेध नोंदविला तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन छेडत  नायब तहसीलदार सुधीर नागपूरकर यांना निवेदन घेण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर येण्यास भाग पाडले. आंदोलनात  नगरपंचायत उपाध्यक्ष  गोपाल मानधने सभापती बबनराव चोपडे,माजी सभापती विनायक कुटे,नगर पंचायत सभापती रुपाली टनमने, सरपंच संघटना सरपंच राजुभाऊ इंगोले,नगरसेवक रियान, पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे, शिवाजी बकाल,बाजार समिती उपाध्यक्ष प्रकाश अंभोरे,संचालक किसान घुगे,डॉ प्रमोद नवघरे, डॉ संतोष बाजड,काँग्रेस युवक जिल्हा अध्यक्ष बाबुराव शिंदे,सुभाष वाझुळकर,गणपत गालट,प्रश शिंदे,नानाराव अदमणे ,मधुकर काळे,नंदाबाई गणोदे,सौ शोभाबाई डाखोरे आदी सह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी झाले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.