अचलपूर:-/श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष युवा नगरसेवक विवेक श्रीकृष्ण सोनपरोते यांची नुकतीच युवा संघर्ष संघटनेच्या जिल्हा प्रमुख पदी नियुक्ति झाली.पदभार सांभाळताच शेतक-यांचे विविध मागण्या करिता आसेगावपुर्णा येथे चक्का जाम करुन त्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष असण्याचे सिध्द केले.
संघटनेचे संस्थापक जितेंद्र मस्करे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा प्रमुख श्रीराम मायकर व जिल्हा प्रमुख विवेक सोनपरोते यांनी शेकडो शेतक-यांच्या सहभागाने आसेगांव पुर्णा येथे रास्ता रोको आंदोलन करून शेतक-यांचे कर्जमाफी,सातबारा कोरा,शेतमालाला भाव अशा विविध मागण्या शासनदरबारी मांडण्यासाठी निदर्शने केली.अमरावती परतवाडा महमार्गावर वाहने थांबवून शांततेने आपल्या मागण्या मांडत जिल्हा परिषद सदस्यांना निवेदन दिले आसेगांव पुर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय आखरे यांनी चोख बंदोबस्त ठेवून 40 कार्यकर्त्यांना कलम 68 नुसार ताब्यात घेवून स्थानबद्ध करून नंतर सोडून दिले व रास्तारोको शांततेने पार पाडला.

Post a Comment