गडचिरोली –
नक्षलवाद्यांचे समर्थक आणि देहली विद्यापिठातील प्रा. साईबाबा यांच्यासह ५ जणांना गडचिरोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली. त्याचा नक्षलवाद्यांनी तीव्र विरोध केला आहे. या सर्वांची तात्काळ सुटका करावी, या मागणीसाठी नक्षलवाद्यांनी २९ मार्च या दिवशी ‘भारत बंद’चे आयोजन केले आहे.तसेच हुतात्मा भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ २३ ते २९ मार्च या कालावधीत साम्राज्यवादी विरोध सप्ताहाचे आवाहन केले आहे. तशी पत्रके भामरागड, एटापल्ली, छत्तीसगड आणि तेलंगणा या भागांमध्ये सापडली आहेत.
त्या पत्रकात म्हटले आहे की, प्रा. साईबाबा यांच्या शिक्षेविरुद्ध तीव्र आवाज उठवू. ब्राह्मणीय हिंदुत्व फॅसिसवादाच्या विरोधात व्यापक लोकतांत्रिक, धर्मनिरपेक्ष संयुक्त मोर्च्यात निर्माण करण्यात येणार आहे. (नक्षलींचा हिंदुद्वेष ! – संपादक) जनयुद्धाला अधिक तीव्र करून ‘ऑपरेशन ग्रीन हंट’ला हरवणार आहोत. (देशातील गृह विभागाला आव्हान देणाऱ्यां नक्षलींचा शासन बीमोड कधी करणार ? – संपादक) जगदलपूर कारागृहात संप करणाऱ्यां २ सहस्र बंदीवानांना पुष्कळ मारहाण करणाऱ्यां) पोलिसांवर कारवाई, तसेच कारागृहातील जनवादी, मानवाधिकार आंदोलनकर्ते, विस्थापनविरोधी आंदोलन आणि क्रांतिकारी आंदोलनातील कार्यकर्ते यांना ‘राजकीय कैद्याचा दर्जा’ देण्याची मागणी लावून धरली आहे. नक्षलवादी कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनाही कारागृहात डांबण्याचा विरोध करून त्यांची तात्काळ सुटका करा, अशीही मागणी त्या पत्रकात नमूद केली आहे.
Post a Comment