आळंदी (पुणे) –
वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाला २२ मार्च या दिवशी प्रारंभ झाला आहे. सोहळ्याला पहिल्या दिवशी १५ सहस्रांहून अधिक वारकरी उपस्थित होते. यात अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासमवेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहात प्रतिदिन श्रीरामकथेचे आयोजन केले आहे. रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांनी कथेचा पहिला भाग सांगितला. ‘समाजाला छत्रपती शिवाजी महाराज हवे असतील, तर त्यासाठी माता जिजाऊ जन्मल्या पाहिजेत; म्हणूनच भ्रूणहत्या होऊ देऊ नका’, असेही त्यांनी सांगितले.
Post a Comment