Monday, March 6, 2017
राममंदिरासाठी संसदेत कायदा करा ! – डॉ.श्री प्रवीण तोगाडिया यांचा पुनरुच्चार
Posted by vidarbha on 8:19:00 AM in मथुरा | Comments : 0
मथुरा –
अयोध्येत राममंदिरासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा बनवला पाहिजे. यासाठी केवळ १ घंट्याचा वेळ लागेल, असा पुनरुच्चार विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी ४ मार्च या दिवशी येथे केले. यासाठी त्यांनी ट्रम्प यांचे उदाहरण दिले. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीवर बसल्याच्या एका आठवड्यात ७ इस्लामी देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय न्यायालयात टिकला नाही, ही गोष्ट निराळी असली, तरी त्यांनी निर्णय घेण्याचे धाडस दाखवले. जर ट्रम्प असा निर्णय घेऊ शकतात, तर भारत राममंदिराचा निर्णय का घेऊ शकत नाही ?, असा प्रश्न डॉ. तोगाडिया यांनी केला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment