प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या नावाचा अपवापर करत केली पोस्ट व्हायरल : प्रा. बानुगडे-पाटील यांची पोलिसात तक्रार
सातारा– काही हिंदुद्वेष्ट्या संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून सामाजिक संकेस्थळांवर नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरे न करण्याविषयी बुद्धीभेद करणारे लिखाण पसरवले जात आहे. विशेष म्हणजे या लिखाणात शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. हे प्रा. बानुगडे-पाटील यांना समजल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेतली. याविषयी रहिमतपूर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.
हिंदु नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ होते; मात्र या सणाचा धर्माशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे हा सण साजरा करण्यात येऊ नये, असे बुद्धीभेद करणारे लिखाण सध्या सामाजिक संकेतस्थळांवर फिरत आहे. एका ऐतिहासिक महापुरुषाचा संबंध गुढीपाडव्याशी जोडण्यात आला आहे. त्या पोस्टमध्ये वादग्रस्त विधाने असून पोस्टखाली प्रा. बानुगडे-पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे ही पोस्ट प्रा. बानुगडे-पाटील यांनीच पाठवले असल्याचा अपसमज सर्वत्र पसरला आहे. ही पोस्ट प्रा. बानुगडे-पाटील यांनी पाहिल्यावर त्यांनी तात्काळ जल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी दूरभाषवर चर्चा करून रहिमतपूर येथील पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६३ अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे करत आहेत.
माझ्या नावाचा अपवापर करणार्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी ! – प्रा. बानुगडे-पाटील
सध्या सामाजिक संकेतस्थळांवर गुढीपाडव्याविषयी माझे नाव वापरून काही चुकीचे संदेश पसरवले जात आहेत. असे अपसमज पसरवणारे संदेश मी पाठवलेले नसून कृपया ते कोणीही पुढे पाठवू नयेत. तसेच माझे नाव वापरून असे संदेश पाठवणार्यांच्या विरोधात मी पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रा. बानुगडे-पाटील यांनी केली आहे.
या वादग्रस्त आणि हिदुद्वेषी पोस्टमधील काही आक्षेपार्ह विधाने !
१. गुढीपाडवा हा सण संभाजी राजांच्या हत्येनंतर दुसर्या दिवसापासून चालू झाला. त्या पूर्वी कधीच गुढ्या उभारल्याचा इतिहास नाही.
२. संभाजींना हालहाल करून मारल्याने बामणं इतके आनंदित झाले की, त्यांनी हत्तीवरून साखर वाटली. त्यानंतर संभाजीचे शिर तलवारीच्या टोकावर घेऊन परिसरात फिरलेत
३. रयतेचं राज्य संपवून यशस्वीपणे पुन्हा ब्राह्मण राज स्थापन झाल्याचा तो इशारा होता. हा ब्राह्मणांंचा विजय दिवस आहे; म्हणून याविषयी बामणं जास्त आग्रही असतात. या विजय दिवसाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली.
४. घट किंवा तांब्या जो नेहमी सरळ ठेवणे शुभ मानले जाते तो; मात्र पाडव्याला उलटा ठेवला जातो, हे संभाजी राजांच्या शिराचे प्रतीक आहे
५. गुढी बांबूपासून बनलेली असते. धर्मशास्त्रात बांबूचा वापर प्रेतासाठी करतात.
६. कोरे कापड आणि लिंबाची पाने हेसुद्धा प्रेतासाठी वापरतात, मग या गोष्टी शुभ कशा ?
७. गुढीपाडवा केवळ महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्राबाहेर कोठेही साजरा केला जात नाही. आपल्याला सांगितले जाते, रावणाच्या पाडावानंतर रामाने अयोध्येत प्रवेश केला, तेव्हा लोकांनी गुढ्या उभारून स्वागत केले; पण उत्तरप्रदेशातील लोकांना गुढीविषयी काहीही माहीत नाही.
Post a Comment