BREAKING NEWS

Sunday, March 5, 2017

संस्कृतीच्या रक्षणाकरीता लोकसंख्या वाढविणे गरजेचे उपाध्याय निर्भयसागरजी महाराज

वाशीम : महेंद्र महाजन -


आज जैन समाज भौतीक सुखसुविधेत लिप्त झालेला आहे. सुखसुविधेच्या गर्तेत चेतनाचा विकास झालेला नाही. जोपर्यत व्यापार, पैसा, घर, दुकानाचा विकास होईल, लोकसंख्येचा विकास होणार नाही तोपर्यत आपली संस्कृती सुरक्षीत राहू शकत नाही. मंदिर, धर्मशाळेविना धर्मसंस्कृती सुरक्षीत राहील. मात्र धार्मिक व्यक्ती नसेल तर जैनत्वाची प्राचीन संस्कृती जीवंत राहणार नाही. जैन समाजाने आपली लोकसंख्या वाढवावी व हम दो हमारा एक याच्यापेक्षा हम दोन हमारे चार हे तत्व अंगीकारावे असे आवाहन वैज्ञानिक संत, प्रखर वक्ते उपाध्याय श्री निर्भयसागरजी महाराज यांनी केले.
    स्थानिक न.प. जवळील महावीर भवन येथे आयोजीत प्रवचनात त्यांनी वरील मार्गदर्शन केले. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री उपाध्याय निर्भयसागरजी महाराज यांच्यासमवेत मुनीश्री शिवदत्त सागर महाराज, एलक सुदत्तसागर महाराज, क्षुल्लक  तत्वसागर महाराज,क्षुल्लक  चंद्रदत्तसागर महाराज यांचे आज वाशीम येथे आगमन झाले. मुनीसंघाचे सकल जैन समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. मुनीसंघ मांगीतुंगी येथे जाणार आहेत. तीन दिवस वाशीम शहरात त्यांच्या प्रवचनाचा लाभ भक्तांना मिळणार असून आज झालेल्या प्रवचनात मुनीश्री निर्भयसागरजी महाराज यांनी सांगीतले की, चार मुलांची परंपरा सुरु करु. एक देशासाठी देशभुषण, दुसरा समाजासाठी समाजभुषण, तिसरा परिवार परंपरेसाठी कुलभुषण व चौथा धर्मासाठी धर्मभुषण राहील. मात्र आम्ही फक्त हम दो हमारा एक ही संस्कृती आत्मसात केल्याने तो केवळ प्रदुषण निर्माण करणार आहे. सर्वांनी आपल्या शक्तीला ओळखून सामाजीक एकता, पारिवारीक एकता बनवून धर्म, समाजाची सुरक्षा व संस्कृती यांना योगदान देणे जरुरी आहे. आज साठ वर्षावरील सर्व महिला, पुरुष शनिदेवता आहे. आम्ही शनीला तेल अर्पण करतो, पुजा करतो. मात्र आईवडीलांची सेवा, सन्मान करीत नाही. जर आपण आपल्या घरातील वयोवृध्द आजोबा, आजी, आईवडील यांची सेवा केली तर तुम्हाला शनीची साडेसाती कधीच लागु शकत नाही. तो कधीही त्रास देणार नाही. यावेळी मंगलाचरण, भजन झाले. प्रवचनाला सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.