मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे कैफियत मांडण्यासाठी गेलेले संभाजीनगरचे (औरंगाबाद) शेतकरी रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांना पोलीस सुरक्षारक्षकांनी रक्तबंबाळ होईपर्यंत जबर मारहाण केली. तर आज (शुक्रवार) या शेतकऱ्यावर 309 कलमांर्तगत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी गंभीर दखल घेत शेतकऱ्याच्या मदतीसाठी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशन गाठुन पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले.
दोन वर्षापुर्वी झालेल्या गारपीटीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा गावातील हरिभाऊ भुसारे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते.
दोन वर्ष पाठपुरावा करुनही मदत न मिळाल्यामुळे तसेच पिकांना हमी भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी पणेत आत्महत्या करण्यापेक्षा गांजा लागवडी साठी परवानगी मिळावी यासाठी काल तो मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आला होता तेथील सुरक्षा रक्षकांनी व त्यानंतर पोलीसांनी त्यास बेदम मारहाण केल्याणे तो गंभीर जखमी झाला होता. असे असतांना मरिन ड्राईव्ह पोलीसांनी त्यालाच अटक करुन 309 कलमांर्तगत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर बाबीची दखल घेत आज काँग्रेस नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आ .शरद रणपिसे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. मधुसुदन केंद्रे, आ. विजय भांबळे, आ. सुनिल केदार, आ. निरंजन डावखरे, आ. प्रकाश गजभिये, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी यांच्यासह पंधरा ते वीस आमदारांनी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशन गाठुन पोलीसांना जाब विचारला. सरकार कोणाचेही असो पण शेतकऱ्यांना मारहाण करण्याची ही कुठली पध्दत असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.अजितदादा पवार यांनी उपस्थित केला तर शेतकऱ्यांना मारहाण करण्याची सरकारची ही कृती म्हणजे सरकारची जनरल डायरची वृत्तीच असल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. सदरहू शेतकरी कुठे आहे, विचारणा केली असता त्याला न्यायालयात नेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, त्या शेतकऱ्याला दूरध्वनी केला असता त्याने आपल्याला पोलीस ठाण्यातील एका खोलीत ठेवल्याचे सांगितले. पोलीस अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचे लक्षात येताच सर्वच नेते संतप्त झाले. दरम्यान, काही नेत्यांनी त्या शेतकऱ्याला स्वतः शोधून पोलीस निरीक्षकासमोर उभे केले असता. मी आत्महत्येचा प्रयत्न केलेला नसून, उलटपक्षी मंत्रालयात मारहाण झाल्यानंतर पोलिसांच्या वाहनातून पोलीस ठाण्यात आणले जात असताना गळ्यातील गमचा दोन्ही बाजुंनी ओढून माझाच गळा आवळण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिली. त्यामुळे सर्व नेते कमालीचे संतप्त झाले. मदतीची अपेक्षा घेऊन मुंबईला येणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? अशी विचारणा अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना केली. दरम्यान सदर शेतकऱ्या विरुध्द दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, शेतकऱ्यास मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी व सुरक्षा रक्षकांवरही गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
Saturday, March 25, 2017
अखेर विरोधीपक्षांचे नेतेमंडळी त्या शेतकऱ्याच्या मदतीला पोलीस ठाण्यात पोहचले.
Posted by vidarbha on 6:44:00 AM in मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment