अचलपूर नगरपालिका प्रशासनातर्फे शहराला
हागणदारी मुक्त करण्यासाठी जोमाने प्रयत्न चालवले आहे.त्यादृष्टीने काही बाहेर शौचास जाणा-या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली ही बाब खरोखरच
प्रशंसनीय आहे.याकरिता शासनाने भरपुर निधीची सुध्दा तरतूद केल्याचे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात येते.घरोघरी शौचालय सुविधा पुरविण्यात येत असून त्याकरिता शासनाने नागरिकांना आवाहन करून अनुदान
सुध्दा मंजूर करण्यात येत आहे.घरोघरी शौचालय बांधण्यासाठी योजनेची अंमलबजावणी प्रशासनाने सक्तीने करावी शिवाय या योजनेत असणा-या काही अटींमध्ये शिथीलता शासन व प्रशासनाने करून प्रत्येक मालमत्ता धारकांना शौचालय बंधनकारक करावे अन्यथा शासकीय सवलती वर निर्बंध घालण्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन व प्रशासनाने त्वरित पाउल उचण्याची आवश्यकता आहे अशी जनतेत चर्चा आहे.तसेच उघड्यावर शौचास बसने आरोग्यदृष्ट्या हानिकारक आहे परंतू ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्यामुळे
घरोघरी शौचालय बांधण्यासाठी जरी शासन व प्रशासन
प्रयत्न करीत असले तरी सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी
जसे बाजारपेठ,बसथांबे,धार्मिक स्थळ व ठिकाणे अशा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृह व सुलभ शौचालय सुविधा शासनाने पुरवावी अशी जनतेची मागणी आहे.अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी हागणदारी मुक्त शहर करण्यासाठी जोमाने प्रयत्न करीत आहेत पण शहरातील मुख्य बाजारपेठेत मात्र ही सुविधा उपलब्ध नाही.अचलपूर या जुन्या शहरात गांधी पूल,चावलमंडी,देवळी,चांदूरबाजार नाका,अचलपूर नाका,शासकीय आयटीआय स्टाँप,अष्टमासिध्दी स्टाँप,मीलस्टाँप व ईतर अनेक गर्दीच्या ठिकाणी ही सुविधा शासनाने पुरवावी जेणेकरून शहरात व शहरा बाहेर स्वच्छता मोहीम यशस्वी होवून ख-या अर्थाने हागणदारी मुक्त शहर होवून देशाच्या स्वच्छ भारत मोहीमेत आपल्या शहराचा सहभाग होईल अशी जनतेची मागणी आहे.
Post a Comment