अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
सध्या दहावी बारावी च्या परिक्षा सुरू झाल्या आहेत तसेच समोर शिवजंयती व होळी चा सण असल्याने शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे दृष्टीने अचलपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती ची सभा नुकतीच पार पडली.
दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत त्यामध्ये चिडीमारांचा विद्यार्थ्यांनींना त्रास होऊ नये व त्यांच्या भविष्यात चांगले यश त्यांना प्राप्त होण्यासाठी शांततेत परिक्षा देता यावी व परीक्षा केंद्रावर
काही अपरिहार्य घटना होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त
तर चोख ठेवण्यात आला आहे परंतू कुणावर काही कारवाई झाल्यास आपल्यालाच त्रास सहन करावा लागतो म्हणुन समाजासोबत जवळचे संबंध असलेल्या शांतता समिती व प्रतिष्ठित नागरिकांनी या बाबत जागृकता निर्माण करून नेहमीप्रमाणे सहकार्य करावे.तसेच पुढे होळी व शिवजयंती चा उत्सव येत आहे त्यादृष्टीने शांतता व सुव्यवस्थेचे वातावरणात आनंदाने हे उत्सव साजरे करण्यात यावे त्याकरिता सुध्दा शांतता समिती च्या सदस्यांनी नेहमीप्रमाणे सहकार्य करावे.पोलीस यंत्रणा
सज्ज आहेच धुलीवंदन हा रंगाचा उत्सव आहे कुणावर जबरदस्तीने रंग अथवा ईतर धर्मीय लोकांवर रंग उडवून
शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.शिवजंयतीची मीरवणूक नेहमीप्रमाणे सरमसपूरा जगदंब देवी संस्थान येथून निघणार असून बिलनपूरा झेंडा चौक येथे विसर्जीत
होईल या मीरवणूकीत मद्यप्राशन करून किंवा कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाईल असे कृत्य कोणी करू नये याची खबरदारी संयोजक व कार्यकर्ते यांनी घ्यावी.अशा सुचना ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिल्या तसेच याबाबत आपल्या सुचना उपस्थित मान्यवर शांतता समिती सदस्य व नागरिकांनी दिल्या.आपल्या मनोगतात
बोलतांना शांतता समिती सदस्य व नागरिकांनी जेंव्हा पासून ठाकरे साहेब यांनी पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळला तेंव्हा पासून शहरात शांतता व सुव्यवस्थेचे राज्य पाहायला मिळत आहे असे प्रतिपादन केले त्यावर नरेंद्र ठाकरे यांनी सुंदर उत्तर देत म्हटले की शहरातील तुमच्या सारखे चांगले लोक एक पाउल पुढे आल्याने वाईट प्रवृत्ती चे लोक मागे गेले मी व माझ्या पोलीस कर्मचारी वर्गाने काही विशेष केले नाही तर हे सर्व तुमच्या सहकार्याने होत आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे असेच सहकार्य लाभले तर आपल्या शहराला कोणत्याही वाईट घटनेला तोंड द्यावे लागणार नाही याची खात्री आहे.सर्व उपस्थितीतांचे सुधीर काळे यांनी आभार व्यक्त केले.
Post a Comment