Wednesday, March 8, 2017
मानव अधिकार संस्थेच्या विदर्भ उपाध्यक्षपदी अरूण डोंगरदिवे
Posted by vidarbha on 8:25:00 PM in चांदूर रेल्वे / शहेजाद खान - | Comments : 0
चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
मानव अधिकार संस्था व जागतिक माहितीचा अधिकार संस्थेच्या विदर्भ उपाध्यक्षपदी अरूण
डोंगरदिवे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.
अमरावती येथे झालेल्या सभेमध्ये मानव अधिकार संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन म्हसतकर
यांनी अरूण डोंगरदिवे यांची विदर्भ उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड केली. अरूण डोंगरदिवे
मानव अधिकार संस्था व जागतिक माहितीचा अधिकार या सामाजिक संस्थेमध्ये अनेक
वर्षापासून एकनिष्ठेने काम करीत आहे. सर्वांना प्रेमाने आणि आपुलकीने न्याय मिळवून
देण्याचा त्यांचा हातखंडा आहे. सामाजिक कार्याची आवड व गोरगरीबांना न्याय मिळवून
देण्याची तळमळ आणि जनमाणसातील चांगली प्रतिष्ठा पाहता त्यांची विदर्भ उपाध्यक्षपदी
नियुक्ती करण्यात आली. विदर्भ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अरूण डोंगरदिवे यांचे मानव
अधिकार संस्थेचे सुनिल सचदेव, अमरावती जिल्हाध्यक्ष निर्मळ, अहरवार, अनुप
सदानशिवे, अनिल गोपने, रमण धवने, सुभाष पालनकर यांनी जोरदार स्वागत केले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment