अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे येणार
*अमरावती- शहेजाद खान*
शेतकर्यांना कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव आणि आमदारांचे निलंबन कारवाई या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं कवाडे गट, युनायटेड, एमआयएम आदी पक्षांनी चांदा येथून सुरू केलेली संघर्ष यात्रा आज गुरूवारी जिल्ह्यात येत आहे. तिवसा व चांदूर रेल्वे येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीमुळे आत्महत्या करीत असताना सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकर्यांच्या उत्पादनाला हमीभाव नाही, मिळेल त्या भावात आपला माल विकावा लागतो. अच्छे दिन असल्याचा वाजागाजा केल्या जात असताना नेमके अच्छे दिन कुणाचे हा प्रश्न घेऊन काँग्रेससह राष्ट्रवादी आणि अन्य सहयोगी पक्ष संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लोकांशी चर्चा करणार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे देखील तीन तेरा वाजले आहे. गुन्हेगारी वाढली आहे. याच मुद्यावर आवाज उठविणार्या आमदारांचा आवाज दाबल्या जातो, त्यांना निलंबित केले जाते. अशी हुकुमशाही करणार्या शासनाच्या विरोधात या आघाडीने चांदा ते बांदा अशी संघर्ष यात्रा २९ मार्चपासून सुरू केली आहे. ३ एप्रिल रोजी याचा समारोप होणार आहे. आज गुरूवारी या संघर्ष यात्रेचे जिल्ह्यात आगमन होत असून दुपारी ४ वाजता तिवसा येथे तर *सायंकाळी ६ वाजता चांदूर रेल्वे येथे संघर्ष यात्रेमध्ये सहभागी नेते मार्गदर्शन करणार आहे.*
या सभेला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खा. सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे, अजित पवार, जोगेंद्र कवाडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
Post a Comment