संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमीटी आळंदी च्या वतीने 6 लक्ष 25 हजार रू.
तर
मा.मुख्यमंत्री फडणवीस यांचाकडून 1 कोटी रू देणगी
श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी पूर्ती महोत्सवाला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे आज उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते श्री अण्णा हजारे आणि पालकमंत्री श्री गिरीश बापट यांचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
- *महाराष्ट्राच्या सुपंथावर वाटचालीचे श्रेय वारकरी संप्रदायाला* ,
त्यांनी मानवतेचा धर्म जिवंत ठेवला.
- *ज्ञानेश्वर माऊलींनी जागतिकीकरणाची आणि मानवकल्याणाची संकल्पना मांडली*
- *ज्ञान आणि शिक्षणात मोठा फरक* , *वारकरी शिक्षण संस्थेने संस्कारित करण्याचे मोठे कार्य केले*
- पगाराविना शिक्षक आणि शुल्काविना विद्यार्थी ही आजच्या युगातील आदर्श संकल्पना, शासनातर्फे संस्थेला १ कोटी मदत
- *नमामी चंद्रभागाच्या धर्तीवर सर्व नद्या स्वच्छ करणार* , *आळंदीच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटिबद्ध*
यावेळी प.पू.गु.मारोती बाबा कुरेकर, ह.भ.प.संदीपान महाराज हसेगांवकर, आमदार महेशदादा लांडगे,आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, महापौर नितिन आप्पा काळजे* व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितित *कोनशीला अनावरण व सद्गुरू जोग महाराज मंदीरासमोरील सभागृहाचे भुमीपुजन संपन्न*..
Post a Comment