अचलपुर / श्री प्रमोद नैकेले /-
महारष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विभाग द्वारा डॉ ज़ाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना अंतर्गत अनुदान वितरण 2016-17 करिता नुकतेच राज्यात 31 मार्च 2017 ला अनुदान वितरित करण्यात आले. यामध्ये अमरावती ज़िल्ह्यातील 20 मदरस्यांचा समावेश आहे.त्यापैकी अचलपुर तालुका सर्वात जास्त असून जवळपास 11 मदरस्यांना सरकारी अनुदानावर चालत असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.वास्तविकता ही आहे की असा शासकीय अनुदानीत एकही मदरसा तालूक्यात नाही. रहे है। एवढेच नाही तर अनुदान घेतलेले मदरसे ज्या परिसरातील दाखवली आहे त्या परिसरात त्या नावाचे मदरसे अस्तित्वातच नाही.सरकारी यादीतील या मदरस्या बाबत परिसरातील लोकांना विचारले असता त्यांनी सुध्दा या बाबतीत एकही मदरसा येथे नसल्याचे सांगितले.याअगोदर सुध्दा अशाच बनावट व बोगस मदरसा तसेच संस्थेच्या नाववर अनुदान काही लोकांनी उचलले असल्याचे बोलल्या जाते.हे बनावट अनुदान उकळणारे समस्त मुस्लिम समाजाला बदनाम करिता असल्याचे स्पष्ट होते.
अचलपुर मध्ये जेथे मदरसे चालतात त्यांनी कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान घेतलेले नाही.
*अखेर कोन करताे या गोष्टीची तपासणी*
मदरसा आधुनिकीकरण च्या नावाखाली गोरखधंदा लोकांनी सुरू केला आहे. जेव्हा सरकार प्रस्तावाची मागणी करते हे लोक लगेच प्रस्ताव सादर करतात व लाखो रुपयांचे अनुदान मिळवून घेतात. वास्तविक जे मदरसे खरोखर प्राचीन काळापासून सुरु आहेत त्यांना आजपर्यंत कोणत्याही अनुदानाची गरज पडली नाही. सरकारी अधिकारी सुध्दा काही चौकशी व तपासणी न करता प्रस्ताव शासनाला पाठवुन देतात किंवा त्यांचाही काही हिस्सा यामध्ये असु शकतो ही बाब सुध्दा नाकारता येत नाही अशारितीने अनुदान प्राप्त करून आपले खिसे गरम होत असल्याचे स्पष्ट होत आहे.अशाच लोकामुळे मुस्लिम बालके शिक्षीत न होता निरक्षरता वाढत आहे.
निसार खान चीस्ती बानी जामीया नीगरा सुन्नी दावाते इस्लामी शाखा अचलपूर |
अचलपूर शहरात दोन मोठे मदरसे स्वताःच्या खर्चावर चालवणारे निसार खान नज़िर खान चीसती वीलायातपुरा यांनी याबाबत प्रतिक्रिया देतांना म्हटले की मला हे एकुण खुप दुख: झाले आपल्या महाराष्ट्र सरकार चे पैश्यांचा याप्रमाणे मदरश्यांचा नावावर दुरूपयोग केल्या जात आहे.याचप्रकारे पवित्र उद्देश असलेल्या मदर्स्यांना बदनाम करने फार मोठे पाप आहे.ज्या लोकांनी डाँ. ज़ाकिर मदरसा आधुनीकीकरण मध्ये अनुदान घेतले त्यांची कसून चौकशी व्हावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.पुढे त्यांनी सांगितले की आम्ही कित्येक वर्षांपासून जामिया गुलशन फ़ातेमा कन्या शाळा व जामिया या रसुल अल्लाह हे दोन मदरसे माझ्या मालकिच्या जाग्यावर स्वखर्चाने चालवत आहे आम्ही आजपर्यंत शासन किंवा अन्य संस्था कडून कोणतेच अनुदान घेतलेले नाही. जर कोणत्या दिलदार व्यक्तीने बालकांना काही खाण्यापीण्याच्या वस्तू दिल्या तर घेतो पण स्वतः कुणाला काही मागत नाही.आम्हाला इश्वराचीच मदत खुप आहे. ज्या लोकांनी मदरस्यांच्या नावावर बोगस अनुदान घेतले असेल त्यांच्यावर कार्यवाही व्हायलाच पाहिजे असे मत व्यक्त केले
Post a Comment