BREAKING NEWS

Saturday, April 8, 2017

खादी उत्पादनाचे विक्री व प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते

भंडारा


जिल्हयातील शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांना खादीचे वस्त्रे उपलब्ध व्हावीत या हेतून खादी उत्पादनाचे विक्री व प्रदर्शनाचा स्टॉल 6 ते 8 एप्रिल या कालावधीत सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत प्रशासकीय इमारतीत सुरु करण्यात आला. या स्टॉलचे उदघाटन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेला मालार्पण करुन करण्यात आले. 
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मदन खडसे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, विक्रीकर निरिक्षक राजेश राऊत उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्टॉलवरील खादी समिती अमरावती येथील सदस्य राहूल पाटील, विमल बिलगये, विजया शर्मा यांचेकडून खादी कापडाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच खादीचे कापड जास्तीत जास्त विक्री होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी काया्रलयाचे वतीने खादीचे कापड अधिकारी व कर्मचारी वर्गांना खरेदी करण्याबाबत सूचना देण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी खादी ग्रामोद्योग केंद्राचे कर्मचारी, परीसरातील कर्मचारी उपस्थित होते. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.