BREAKING NEWS

Sunday, April 9, 2017

आज चांदुर रेल्वेत 'शांतेच कार्ट चालु आहे' तुफान विनोदी नाटक


महारूद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्था व साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेचे आयोजन

नाटकात शहरातीलच कलाकारांचा समावेश




चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) -


 शहरातील महारूद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्था व साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे 'शांतेच कार्ट चालु आहे' या तुफान भन्नाट विनोदी नाटकाचे आज ९ एप्रील रविवारी सायंकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
           स्थानिक जिल्हा परीषद हायस्कुलमध्ये आयोजित या नाटकामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे, नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, प्राचार्य दामले, जि.प. हायस्कुलचे मुख्याध्यापक इंगळे व पत्रकार युसुफ खान आदी उपस्थित राहणार आहे. नाटकाचे लेखक श्रीनिवास भणगे असुन दिग्दर्शक दिपक बनसोड आहे. संपुर्ण नाटकाची निर्मीती चेतन भोले या युवकाने केली आहे. नाटकातील कलाकार हे चांदुर रेल्वे तालुक्यातीलच आहे. प्रथमच शहरातील कलाकार असे मोठे सादरीकरण करणार आहे. आज होणारे नाटक हे तुफान विनोदी असुन चांदुर रेल्वे वासीयांना नक्कीच हसविणार आहे. नाममात्र शुल्कमध्ये नाटक बघता येणार असुन तरी जास्तीत जास्त तालुकावासीयांनी उपस्थित राहुन नाटक बघण्याचे आवाहन संस्थेचे  अध्यक्ष चेतन भोले, उपाध्यक्ष सचिन उईके, सचिव अमोल ठाकरेसह महारूद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्था व साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.