BREAKING NEWS

Sunday, April 9, 2017

आगामी हनुमान जयंती व महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अचलपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती ची सभा संपन्न

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-

आगामी हनुमान जयंती व डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ऊत्सवा निमित्त शहरात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण राहावे व सर्वधर्म समभाव नांदावा या दृष्टीने अचलपूर पोलिस स्टेशन मध्ये शांतता समिती ची सभा संपन्न झाली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार नरेंद्र ठाकरे प्रमुख अतिथी सहा.पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या उपस्थितीत शहरातील गणमान्य शांतता समिती सदस्यांनी आपले विचार मांडले यामध्ये गौशाला शोभायात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष मोहनजी गोखले यांनी नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली त्यांनी सांगितले की अकरा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता हनुमान मंदिर देवळी येथून शोभायात्र जुना सराफा,टक्कर चौक,चावलमंडी,फुटी मज्जीद मार्गे पोलीस स्टेशन चौक होवून हनुमान मंदिर देवळी येथे समारोप होईल तर प्रल्हाद अग्रवाल यांनी काळाहनुमान येथे हजारो महिला पुरुष मंडळी दर्शनाला येतात सुरक्षा व शांतता प्रस्थापित करण्यासाठी योग्य बंदोबस्त ठेवण्यात यावा तसेच या मार्गावर असणा-या खुल्यावर मास कापून विकणा-या दुकानदारांना या दिवशी थोडी सावधगिरी ठेवण्यात यावी अशा सुचना द्याव्या असे प्रतिपादन केले.वानखडेकाकांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघणा-या मिरवणूकी बद्दल माहिती देतांना चौदा एप्रिल रोजी संध्याकाळी दुलागेट येथून सुरू होवून गांधी पूल दिक्षाभूमी येथे समाप्त होईल या दरम्यान विद्यूत पुरवठा बंद होवू नये याची खबरदारी घ्यावी असे सुचवले तर नियाजभाई यांनी याप्रसंगी सर्व उत्सव शांततेने पार पडतील असे आश्वासन दिले.अध्यक्षीय भाषणात ठाकरे यांनी पोलिस प्रशासन सर्वोतपरी खबरदारी घेतील,विद्युत वितरणची टीम सोबत राहील तसेच हनुमान जयंती शोभायात्रेत मद्यपींचे प्रमाण नसल्याचे कौतुक केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघणा-या मिरवणूकीत सुध्दा आयोजकांनी काळजी घ्यावी तसेच चांगले लोक दोन पाऊल समोर आले तर वाईट प्रवृत्ती आपोआपच मागे जातात असे प्रतिपादन केले तसेच सायबर क्राईम व छेणखानी बद्दल सतर्क रहावे कोणत्याही फोन काँल वर आपले एटीएम नंबर किंवा पिनकोड न सांगता असे काँल आल्यास त्वरित पोलीस स्टेशन ला कळवा.अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.महिलांची व मुलींची छेड काढणा-यांची हयगय केली जाणार नाही आपण सुध्दा अशा प्रकारच्या घटना दिसल्यास त्वरित थांबवून अथवा पोलिसांना माहिती द्यावी असे प्रतिपादन केले.कांबळे यांनी उपस्थितीत सर्वांचे आभार मानले.सभेला शांतता समिती सदस्य,आयोजन समिती सदस्य व मान्यवर नागरिकांना उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.