BREAKING NEWS

Sunday, April 9, 2017

खुद्द पोलीस अधीक्षक यांनी केलेली गावठी दारु अड्यावरील कार्यवाही-गावठी हातभट्टीवर छापा टाकून लाखो रुपयांचा माल जप्त

महेंद्र महाजन / रिसोड  /  वाशीम -


वाशिम जिल्ह्यातील
अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या   मोहगव्हाण येथे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी खुद्द  गावठी दारू अड्यावर  एलसीबी ला सोबत घेऊन छापा टाकत  १ लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात  कार्यवाही दि 8 एप्रिलला ला केली . सदर कार्यवाही एका हप्त्यात दोनदा करण्यात आल्याने या भागात मोट्या प्रमाणात दारू अड्डे असल्याचे दिसून येत आहे 1 एप्रिलला एलसीबीनी  याच ठिकाणी छापा टाकून 1 लाख तीन हजार सातशे पन्नास रुपयांचा माल जप्त केला होता एका हप्त्यात  त्याच शिवारात खुद्द पोलीस अधीक्षक साहेबानी कार्यवाही केल्याने अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे

 पोलीसांना  दिलेल्या माहितीनुसार   मोहगव्हाण येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारु काढल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली  खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी  पुढाकार घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.हेमंत गिरमे व कर्मचाऱ्या सोबत घेतले. मोहगव्हाण येथील धरणाजवळ जंगलामध्ये काही इसम गावठी हातभट्टी गाळीत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलीसांनी उस्मान हुसेन नंदावाले, तुकड्या खैरु औरंगाबादी,नजीर रशीद नंदावाले, जैमीन पिरु नंदावाले यांच्या गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून सडवा मोहा एकूण ३ हजार ४५ लिटर व ५०१ लिटर गावठी हात भट्टी दारु एकूण १ लाख ९२ हजार ६२० रुपयांचा माल जप्त केला. यावेळी अकबर शब्बीर औरंगाबादी याला पकडण्यात पोलीसांना यश आले. या आरोपींविरुध्द पो.स्टे. अनसिंग येथे मुंबई प्रोव्हीशन अँक्ट कलम ६५ (फ) प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांच्यासह सदर कारवाई पो.नि.गिरमे, पो.हे.काँ. नारायण जाधव, संजय नंदकुले, लक्ष्मण कोल्हे, प्रदीप चव्हाण, प्रकाश सरनाईक, पो.शि.बालाजी बर्वे, चालक पो.हे.काँ. आत्माराम राठोड आदींनी केली .

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.