BREAKING NEWS

Sunday, April 9, 2017

सेनगांवात महाविर जयंत्तीनिमित्त मांसाहार विक्री बंद करण्याची जैन बांधवांची मागणी!

वाशिम / महेंद्र महाजन जैन / रिसोड -

सेनगांव:- अंहीसेचे पुजारी महाविर यांच्या जयंत्तीनिमित्त सेनगांव शहरात दि.०९ एप्रिल रविवार व १० एप्रिल सोमवार पर्यंत पुर्णत: मांस विक्री बंद करण्याची मागणी आज दि.०८ एप्रिल शनिवार रोजी दुपारी नगरपंचायत चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे निवेदन देऊन जैन बांधवांनी केली आहे.
जैन समाजाचे आराध्य दैवत व अंहीसेचे पुजारी महावीर यांची जयंत्ती दि.०९ एप्रिलला असुन या दिवशी अंहीसा दिन म्हणुन ही पाळल्या जातो  त्यामुळे दि.०९ एप्रिल व १० एप्रिल सोमवार पर्यंत सेनगाव शहरातील मांसविक्री बंद ठेवण्यात येऊन जैन समाजाचा आदर ठेवावा या मागणीचे निवेदन सेनगांव शहरातील जैन समाजबांधवानी आज दि.०८ एप्रिल शनिवार रोजी नगरपंचायतचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर शरद संघ ई, सुशील उखळकर, आदेश पंचवाटकर, प्रफुल्ल बोराळकर, संतोष उखळकर, संजय जोगी, हेमंत सघ ई, बबलु उखळकर, संदिप जैन आदीसह बहुसंख्येने जैन समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.