BREAKING NEWS

Saturday, April 15, 2017

डॉ.पांडुरंग ढोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रूग्णवाहिका प्रदान - तेरवीच्या परंपरेला फाटा

१८ एप्रिल ला सामूहिक श्रध्दांजली सभा
चांदूर रेल्वे / शहेजाद खान -

शेतकरी, शेतमजुरांचे कैवारी , गोरगरीब दीन दलित, सर्व सर्वसामान्याचे जनतेचे नेते, ओबीसी
स्कॉलरशीपचे शिल्पकार जनता दल सेक्युलरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार
डॉ.पांडुरंग ढोले यांचे ६ एप्रिल रोजी अकस्मीत निधन झाले. सामाजिक परंपरेनुसार मृत्यूप्रश्चात
तेरवीचा कार्यक्रम करण्यात येतो. मात्र डॉ.पांडुरंग ढोले यांच्या तेरवीचा कार्यक्रम न घेता रूग्ण
सेवेकरीत रूग्णवाहिका देण्याचे त्यांचे पुत्र डॉ.क्रांतीसागर ढोले यांनी जाहिर केले. माजी
आमदार डॉ.पांडुरंग ढोले यांना श्रध्दाजंली देण्यासाठी १८ एप्रिल रोजी स्थानिक जुना मोटर
स्टँड चौक येथे सामूहिक श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी
आयोजित पत्रपरिषदेत सांगीतले.
सर्वसामान्यांचे कैवारी अशी ओळख असणारे पांडुरंग ढोले यांनी अनेक लोकपयोगी कामात
आपला सहभाग नोंदविला होता. फुले -शाहू-आंबेडकर यांच्या विचारांने प्रेरीत होऊन त्यांनी
सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा वारसा सुरू राहावा, यासाठी
तेरवीचा पारंपारिक कार्यक्रम रद्द करून रूग्णवाहिका देण्याचे ठरविण्यात आल्याचे
डॉ.क्रांतीसागर ढोले यांनी सांगीतले. माजी आमदार डॉ.पांडुरंग ढोले यांच्या श्रध्दांजली
कार्यक्रमात जनता दल (से)राष्ट्रीय महासचिव कुंवर  दानिश अली,जनता दल प्रदेश सचिव
प्रताप होगाडे, खासदार रामदास तडस, आ.प्रा.वीरेंद्र जगताप, माजी आमदार अरूण अडसड,
माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जि.प.सदस्य अभिजित ढेपे, अमरावती जि.प.अध्यक्ष
नितीन गोंडाणे, जनता दल (से) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी इथापे, महंमद नदीम, जनता
दलचे युवा प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, जद महिला आघाडी अध्यक्षा सरीता मानकर, ओबीसी
क्रांती दल यवतमाळ उपाध्यक्ष विलास काळे, चांदूर रेल्वे नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी, चांदूर रेल्वे
कृउबासचे सभापती प्रा.प्रभाकर वाघ, महसुल अधिकारी, जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते,
सर्व अधिकारी अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते,
तसेच राज्य जनता दल कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
या पत्र परिषदेला सुधीर सव्वालाखे, धर्मराज वरघट, अंबादास हरणे, अवधुत सोनोने, संजय
डगवार, विलास हेरोडे अशोक हांडे, सतिश वानखडे यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित
होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.