Saturday, April 15, 2017
तालुक्यातील अतीभार वाहतुक करणाऱ्या रेती माफीयांचे धाबे दणाणले - तहसिलदारांनी पकडले ५ रेती ट्रक
Posted by vidarbha on 8:23:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )- | Comments : 0
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
तालुक्यात अनेक दिवसांपासुन अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांचा धुमाकुळ सुरू होता. याची माहिती होताच तहसिलदारांच्या मार्गदर्शनात धडाक्याची कारवाई करीत ५ ट्रक पकडुन तहसिल कार्यालयात जमा केले.
शुक्रवारी राबविलेल्या मोहीमेत महसुल कर्मचाऱ्यांनी चांदुर रेल्वे शहरातील विरूळ चौक येथे १ ट्रक व तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे ४ ट्रक असे एकुन ५ ट्रक पकडुन तहसिल कार्यालयात जमा केले. यामध्ये एमएच ०४ सीपी २३५७, एमसीजी ५६४७, एमएच ३१ डब्लु ४२४५, एमएच ३४ एम ४६९१, एमडब्लुवाय २६५७ या नंबरच्या ट्रकांचा समावेश आहे. सदर ट्रक रेतीघाट आष्टा येथुन रेती भरूण आले होते. या कारवाईत तहसिलदार बि.ए. राजगडकर, नायब तहसिलदार पळसकर, देशमुख, राठोड, मंडळ अधिकारी वाढोणकर, इंगळे, तलाठी सुडके, वानकर, पल्ले, पुसदकर यांचा समावेश होता. वृत्तलिहोस्तर दंडात्मक कारवाईची प्रक्रीया सुरू होती.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment